सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळींना कार्यकर्त्यांची आठवण होते. एरवी आपली सत्ता केवळ स्वकीयांच्या भल्यासाठी वापरणारी नेतेमंडळी निवडणुकीची चाहूल लागताच वाट चुकवून कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त शोधत असतात. दिग्रस विधानसभा मतदार क्षेत्रात ‘बडनेरा पॅटर्न’ राबवून कार्यकर्त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न होत आहे.दिवाळी फराळ वाटपाचे निमित्त करून चार वर्षात दुखावलेल्या, दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्रस विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची भलीमोठी यादी तयार करून त्यांना दिवाळी फराळाचे पॅकेट दिले जात आहे. बडनेरा विधानसभा क्षेत्रात तेथील एका उमेदवाराने मतदारांच्या घरापर्यंत तीन हजार रुपयांचा किराणा असलेली पिशवी पोहोचविली होती. या किराण्याच्या संपर्क अभियानातून निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले. हाच फंडा आता दिग्रस मतदारसंघात राबविला जात आहे.सत्तेत बसल्यानंतर नेत्यांकडून अपेक्षा वाढतात. यामुळेच कार्यकर्ते नाराज होतात. नेत्याने कार्यकर्त्यांना दोन कामे मिळवून त्याच्या उपजीविकेची व्यवस्था करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र नेतेमंडळी आर्थिक बाबीत कार्यकर्त्यांना दूर ठेवून आप्तस्वकीयांनाच जवळ करताना दिसतात. विविध लाभाचे पाट स्वकीयांपर्यंतच पोहोचविले जाते. कार्यकर्त्याला केवळ निवडणूक काळात वापरून घेतले जाते. त्यांच्याच जीवावर निवडणुका जिंकल्या जातात. त्यानंतरही त्यांना योग्य सन्मान मिळत नाही. यातूनच स्थानिक नेत्याविरोधात नाराजीचा सूर उमटला होता. निवडणुकीच्या वर्षभरापूर्वीच ही नाराजी दूर करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्याकरिता दिवाळी फराळ वाटप केले जात आहे.नेर तालुक्यात एका बरडावरून या दिवाळी फराळाचे वाटप झाले. तो मिळविण्यासाठी काहींनी चांगलीच गर्दी केली होती. आता हा पॅटर्न निवडणुकीत किती यशस्वी ठरतो हे दिसणारच आहे.कुणी नाराज कुणी खूशस्थानिक कार्यकर्त्यांच्या काही गटांमध्ये दिवाळी फराळ वाटपावर बोळवण होत असल्याचाही आक्षेप आहे, तर काही उत्साहींना दिवाळीचा फराळ म्हणजे नेत्याने पंचायत समिती, जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यागत वाटत आहे.
कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी दिवाळी फराळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 9:48 PM
निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळींना कार्यकर्त्यांची आठवण होते. एरवी आपली सत्ता केवळ स्वकीयांच्या भल्यासाठी वापरणारी नेतेमंडळी निवडणुकीची चाहूल लागताच वाट चुकवून कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त शोधत असतात.
ठळक मुद्दे‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न : दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात बडनेरा पॅटर्न