शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

डोळ्यात नाही, आता गावात पाणी आणूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:54 PM

पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे.

ठळक मुद्देसंकल्प : कळंब तालुक्यातील ९३ गावे ‘वॉटर कप’मध्ये, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात कामांना सुरुवात

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पावसाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या-गावे पाणी टंचाईच्या लाटेत होरपळत आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येऊ लागले, ही वास्तविकता आहे. परंतु आता ‘डोळ्यात नाही तर, गावात पाणी आणूया’, हा संकल्प ९३ गावातील लोकांनी केला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत टंचाईमुक्त गावासाठी त्यांची धडपड सुरू आहे.गतवर्षी ६४ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. खडकी, शंकरपूर, राजूर, गणेशवाडी, खटेश्वर आदी गावांनी दखलपात्र कामे केली. यावर्षी स्पर्धेत ९३ गावे सहभागी झालीत. ६० गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण पूर्ण करुन जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली. यात नरसापूर, इचोरा, रासा, उमरी, गांढा, खडकी, नांझा, सावंगी (डाफ), निमगव्हाण आदी गावाचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप राबविली जात आहे. ही स्पर्धा म्हणजे जलसंधारण व मृदसंधारणाचे यथायोग्य व्यवस्थापन करणे होय. या स्पर्धेत गावांच्या पुढाकारातून केलेले सामूहिक प्रयत्न हीच या कामाची कसोटी लावणारी आहे. रोपवाटिका, शोषखड्डे, चर, बीज संकलन, तळे या कामांना गती देण्यात आली आहे. स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होत असली तरी, अनेक गावात आतापासूनच कामाला सुरुवात झाली आहे.लोकांचा उत्साह वाढावा यासाठी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, पाणी फाऊंडेशनच्या तालुका समन्वयक अर्चना दवारे यांच्या मार्गदर्शनात गावागावात शिवारफेरी आयोजित केली जात आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा सकारात्मक प्रयत्न गावातील नागरिकांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे.योजनेविषयी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार म्हणाले, राळेगाव उपविभागातील कळंब आणि राळेगाव तालुक्यात अनेक गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. दुष्काळावर मात करण्याºया या कामात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे येणाºया काळात दुष्काळावर निश्चित मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकसहभागातून उभी झाली मोठी रक्कमगतवर्षी अनेक गावात तीन ते साडेतीन लाख रुपये लोकसहभागातून उभे झाले होते. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही मोठा सहभाग होता. याहीवर्षी अनेक गावातील दानशूर व्यक्ती स्पर्धेत तन-मन ऐवढेच नाही तर धन देऊनही आपला खारीचा वाटा उचलत आहे.

टॅग्स :Waterपाणी