लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लीजपट्टे मिळाले नसलेल्या गरजू लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे. नगराध्यक्ष वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.शहरातील अशोकनगर, चमननगर, नबाबपूर, भीमनगर, वलीसाहबनगर, आजंती रोड आदी भागातील ५० ते ६० वर्षापासून वास्तव्याला असलेल्या नागरिकांना अजूनही लिजपट्टे मिळालेले नाही. त्यांच्याकडे नगरपरिषदेचा ८ अ असून कराचा भरनाही करतात. अशा लोकांना पंंतप्रधान घरकूल योजनेचा लााभ देण्यात यावा, शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनायक भेंडे, पंजाबराव खोडके, श्रीकांत ठाकरे, राजीक भाई, बाशीद खान, धनंजय वानखडे, महिला अध्यक्ष रत्ना मिसळे, नंदा वानखडे, प्रिया भोयर, जयंत खानंदे, मोहन खोडके, प्रकाश काळे, शहाबाज शेख, सुभाष गुगलिया, विजय ठाकरे, केशव मोहरकर, मुरुलीधर भुसे, अजहर खान, गणेश मोहरकर, अशोक राठोड आदींसह घरकुलापासून वंचित असलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लीजपट्टे नसलेल्यांनाही घरकूल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:38 PM
लीजपट्टे मिळाले नसलेल्या गरजू लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे. नगराध्यक्ष वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी निवेदन स्वीकारून शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
ठळक मुद्देकाँग्रेस कमिटी : नेर नगर परिषदेला निवेदन सादर, नगराध्यक्षांनी प्रयत्नांची दिली ग्वाही