शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

स्त्रियांकडे मादी म्हणून नव्हे माय म्हणून बघा

By admin | Published: March 18, 2016 2:43 AM

जगाचे दु:ख पचविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. स्त्रियांकडे मादी म्हणून नव्हे तर माय म्हणून बघा, असे आवाहन अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी केले.

सिंधूताई सपकाळ : बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सवदारव्हा/बोरीअरब : जगाचे दु:ख पचविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. स्त्रियांकडे मादी म्हणून नव्हे तर माय म्हणून बघा, असे आवाहन अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी केले. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे सुरू असलेल्या विठ्ठल नामजप रौप्य महोत्सवात गुरुवारी त्या मार्गदर्शन करीत होत्या. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे त्यांनी कौतुक केले. विदर्भातील संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अवर्जून उल्लेख केला. त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. अर्धवट कपडे घालणाऱ्या महिलांवर सडकून टिका केली. विज्ञान युगात वावरत असलो तरीही महिलांनी कुटुंब सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. आई-वडिलांची मान लाजेने खाली जाईल, अशी वर्तणूक करू नये, असे आवाहन त्यांनी तरुण-तरुणींना केले. मी नऊवारी साडी परिधान करून अमेरिकेला गेले होते. तिथे काहीवेळ संकोच वाटला. पण तेवढ्यात आवाज आला, नऊवारी श्रेष्ठ-जय महाराष्ट्र! हे वाक्य कानावर पडताच अभिमान वाटला, अशा शब्दात त्यांनी आपल्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ७५० पुरस्कारांचे मानकरी व हजारो अनाथांची माता असले तरी भिकारी म्हणून आयुष्य जगले. अनेक वर्ष रेल्वे स्टेशनवर भिक मागण्यात गेले. लाडखेड स्टेशनवरही भिक्षा मागितल्याच्या आठवणीला माईने उजाळा दिला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही फुंकर घातली. तरुणांनी मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. वडील मुलांच्या शिक्षणासाठी काळजी करतात. मुलगा मोठा झाल्यावर जन्मदात्यांना विसरत असल्याची खंत सिंधूतार्इंनी व्यक्त केली. विदर्भाची लेख म्हणून मला चोळीबांगडीचा अहेर द्या, तो माझा हक्क आहे. माझी झोळी भरून पाठवा, असे आवाहन करताच उपस्थित महिला-पुरुषांनी सन्मई बाल निकेतनला भरभरून आर्थिक मदत केली. माई व्यासपिठावरून उतरून गाडीत बसताच महिलांनी अश्रूला वाट मोकळी केली. (वार्ताहर)