लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्यांनी वयाची ४० वर्षं पूर्ण केली व त्यांना आता लर्निंग लायसन्स काढायचे आहे अशा व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच ट्रान्स्पोर्टिंगचे वाहन चालविण्याचा परवाना घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच वयोगटातील व्यक्तीला डाॅक्टरांकडून तपासणी केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. शिकाऊ परवाना हा सारथी या पोर्टलवरून अर्ज करून काढता येतो. तेथेच ओटीपी जनरेट करून नोंदणी करता येते. या प्रक्रियेत आधारकार्ड लायसन्ससोबत लिंक होते. यातून संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक आयडेंटिटीही लायसन्ससोबत जोडली जाते. ही सर्व प्रक्रिया सुरक्षित व सहज सोपी अशी आहे.
ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रेशिकाऊ परवाना काढण्याकरिता कायमचा पत्ता असलेले दस्ताऐवज त्यात आधारकार्ड, वीजबिल व वयाचा पुरावा म्हणून दहावीच्या टीसीची झेराॅक्स आवश्यक आहे. आधारकार्ड परवान्यासोबत लिंक केले जाणार आहे.
यूझर आयडीसाठी डाॅक्टरांनाही कागदपत्रे आवश्यकसध्या वैद्यकीय प्रमाणपत्र हे ५० रुपयांत टपरीवरच उपलब्ध आहे. एमबीबीएस डाॅक्टरांच्या नावाचा शिक्का मारून रजिस्ट्रेशन नंबरसह हे प्रमाणपत्र दिले जाते. आता नव्या प्रणालीनुसार लायसन्सकरिता मेडिकल प्रमाणपत्र देण्यासाठी डाॅक्टरांनाही यूझर आयडी घ्यावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
टपरीवरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुरूच
राज्याच्या मेडिकल काैन्सिलकडे नोंदणीकृत डाॅक्टरचेच वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, हे प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाबाहेर टपरीवरच उपलब्ध आहे.
आठवडाभरात घरपोहोच लायसन्स- सारथी पोर्टलवरून परवान्यासाठी अपाॅइंटमेंट घेता येते. नंतर निश्चित तारखेला जाऊन आरटीओ अधिकाऱ्यांसमोर परीक्षा द्यावी लागते. आठ दिवसात परवाना घरपोहोच येतो.
नव्या प्रणालीमुळे शिकाऊ परवाना मिळणे सहज सोपे झाले आहे. सारथी पोर्टलचा वापर करून कुणीही घरबसल्या अपाॅइंटमेंट घेऊ शकतो. शिवाय गर्दीही टाळता येते. वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. - दीपक गोपाळे, सहाय्यक परिवहन अधिकारी