सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. बरेच व्यवसाय ठप्प पडले आहे. मध्यमवर्गीयांना घर चालवणे कठिण होऊन बसले आहे. हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे वांदे झाले. यात जुलै २०१९ पासून आजपर्यंत १८७ कार्डधारक धान्यापासून वंचित आहे. त्यांची व्यक्ती संख्या ६६३ आहे. या कार्डधारकांनी रेशन कार्डची ऑनलाइन नोंदणी करूनही त्यांना धान्य मिळाले नाही.
रेशन कार्डवर स्वस्त धान्य देण्यासाठी पुरवठा विभागाकडून कोणतीच कारवाई केली नसल्याने १८७ कार्डधारक कुटुंब स्वस्त धान्यापासून वंचित आहे. या कुटुंबाच्या समस्येची दखल घेत ८ मार्च २०२१ रोजी ग्रामसभेत यादी तयार करून समस्येचा पाठपुरावा करावा, असा ठराव घेण्यात आला. ठरावाच्या सूचक सुलोचना बाबूराव व्हडगिरे, तर अनुमोदक सहीदा बेगम इकरामोद्दीन नवाब होत्या. तरीही ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही पाठपुरावा केला नाही. आता तरी पुरवठा विभाग व ग्रामपंचायतीने त्वरित निकाल लावून वंचित लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
लाभार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरणार
ग्रामपंचायत गोरगरीब जनतेच्या अधिकाराचे स्वस्त अन्न धान्य मिळवून देण्यात असर्थ ठरत आहे. ग्रामपंचायतीने त्वरित पाठपुरावा न केल्यास वंचित लाभार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुलोचना बाबूराव व्हडगिरे यांनी सांगितले.