शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दात्यांनी दिले १३ हजार रक्तपिशव्यांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी रक्त द्यावे लागते.

ठळक मुद्देशासकीय रक्तपेढी : वर्षभरात १२६ ऐच्छिक रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाला महत्त्व दिले जाते. असे असले तरी अनेकदा जवळच्या नातेवाईकासाठीसुद्धा धडधाकट असलेले आप्तस्वकिय रक्तदान करण्यासाठी मागेपुढे पाहतात. समाजात अजूनही रक्तदानाबद्दल अनेक समज-गैरसमज आहे. या सर्वांवर मात करत यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या चमूने रक्तपिशव्या संकलनाचा आपलाच विक्रम निर्माण केला आहे. याची दखल राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे. यावर्षी तब्बल १३ हजार ४३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी रक्त द्यावे लागते. इतकेच नव्हेतर सिकलसेल, थायलेसिमिया आणि अ‍ॅनिमिया यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज पडते. येथील रुग्णांना शासकीय रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवींद्र राठोड यांच्यासह रक्तपेढी विभागातील संपूर्ण चमू काम करते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये जाणीव जागृतीचे काम केले जाते. थोर संतांच्या, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करावे हा नवा विचार रुजविला जात आहे.वाढदिवस किंवा कुटुंबातील इतर कार्यक्रम या औचित्यावरही रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांनाही रक्तदान केले जाते. यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विकास येडशीकर, रक्तपेढी प्रमुख डॉ.स्रेहलता हिंगवे, डॉ.संजय खांडेकर, डॉ.नीलिमा लोढा, डॉ.हर्षल गुजर, डॉ.विशाल नरोटे यांच्यासह रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दत्ता चौरे, डॉ.राहुल राठोड, डॉ.रसिका अलोणे, डॉ.शिवाजी आत्राम यांच्यासह समाजसेवा अधीक्षक मोबीन दुंगे, आशीष खडसे, गणेश कानडे, तंत्रज्ञ संजय गवारे, देवेंद्र मानकर, रमेश आमले, मधुकर मडावी, प्रदीप वाघमारे, सचिन मेहत्रे, राहुल भोयर, प्रतीक मोटे, नीलेश पळसपगार, अधिपरिचारक केशिराज मांडवकर, परिचर रामदास आगलावे, अभय मुरकुटे, दिलीप केराम, विठ्ठल डोळस आदी प्रयत्नरत आहे.उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची गरजउन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या व रक्तदान शिबिरांची संख्या रोडावलेली असते. अशावेळी आवश्यक रक्तसाठा असावा याकरिता जाणीवपूर्वक शिबिरांचे आयोजन करून रक्तसाठा कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व उपक्रमांतूनच वर्षभरात १२६ ऐच्छिक रक्तदान शिबिर शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून घेतले. ऐच्छिक रक्तदात्यांना डोनर कार्डवर दोन हजार ५०० रक्तपिशव्या गरजेच्यावेळी देण्यात आल्या. अत्यवस्थेतील रुग्णांना विनामूल्य तीन हजार २०० रक्तपिशव्या देण्यात आल्या.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी