शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

जीवनाच्या शोधात स्मशानाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:32 PM

माणूस मृत्यू झाल्याशिवाय स्मशानापर्यंत जात नाही. फार तर एखाद्या आप्त मित्राच्या अंत्ययात्रेपुरती स्मशानाची धावती भेट होते. एरवी स्मशान समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असते.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा महिमा : स्मशानातल्या जलस्त्रोतांवर जगण्यासाठी गर्दी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माणूस मृत्यू झाल्याशिवाय स्मशानापर्यंत जात नाही. फार तर एखाद्या आप्त मित्राच्या अंत्ययात्रेपुरती स्मशानाची धावती भेट होते. एरवी स्मशान समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असते. मात्र, सध्या शहरातील स्मशानांवर जिवंत माणसांचा राबता आहे. ज्या स्मशानातली धूळही जिवंत माणसांना सहन होत नाही, त्याच स्मशानातल्या पाण्यावर सध्या यवतमाळच्या अनेक वस्त्यांची गुजराण सुरू आहे... पाण्याचा शोध घेणारे यवतमाळकर अखेर स्मशानाच्या दारात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनातील जिवंत माणसे पाणी पुरवू शकत नसताना मृत्यूलोकातले पाणी मागास वस्त्यांसाठी अमृत ठरत आहे..!पाणीटंचाईने यवतमाळकरांना बेजार केले आहे. आकाशातून पाऊस आला नाही. जमिनीचा तळ खोदूनही ओलावा सापडेना. आकाश-पाताळ धुंडाळल्यावर थकलेले नागरिक शेवटी स्मशानात पोहोचले आणि काय आश्चर्य! वर्षभर ज्या स्मशानाकडे ढुंकूनही पाहिले नाही, तिथल्या हातपंपाला आणि विहिरीत घेघ्घाल पाणी सापडले! शेवटी जीवनाचा शोध स्मशानाच्या दारात संपला.विशेषत: मागास वस्त्यांना स्मशानांनी टंचाईतही तगडा आधार दिला आहे. वाघापूर रोडवरील स्मशानभूमीच्या आत एक हातपंप आहे. दुसरा हातपंप स्मशानाच्या अगदी दाराजवळ आहे. या दोन्ही हातपंपांना सध्या माणसांची गर्दी मुंग्यांसारखी लगडलेली आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत येथे गुंड, भरणे, ड्रम भरले जात आहेत. या दोन हातपंपांना गर्दी पेलवेनाशी झाल्यावर काही लोक स्मशनापुढे असलेल्या प्राधिकरणाच्या व्हॉल्वचा आधार घेत आहेत. त्यातून ठिबकणारे थेंब साठवून घरी नेत आहेत. केवळ वाघापूरच नव्हेतर लोहारा, संभाजीनगर, चौसाळा रोड, पिंपळगाव रोड आदी परिसरातील नागरिकही येथे येऊन पाणी नेत आहेत.हीच परिस्थिती वडगाव मोक्षधामातही आहे. तिथे मात्र नियोजनही आहे. वडगावातील काही वस्त्यांना टंचाईत मोक्षधामातील विहिरीचाच आधार आहे. तर पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमीतील हातपंपावर सध्या पाण्यासाठी गर्दी होत आहे. स्मशानाचे दर्शनही झाले तरी अनेकांना भीती वाटते. तिथे एखाद्या अंत्ययात्रेला गेलेच तर घरी येताच अंघोळी केली जाते. पण आता त्याच स्मशानांनी यवतमाळरांची तहान भागविली आहे. शेवटी स्मशानात असते कोण? आपलेच वाडवडील! तिथे गेल्यावर आशीर्वादच मिळतील ना!आलीशान गाड्या स्मशानावरवाघापूर रोड स्मशानभूमीवर आॅटोरिक्षा, ठेले घेऊन लोक येत आहेत आणि पाणी भरून नेत आहेत. एवढेच काय, रोज रात्री आलिशान कारमध्ये बसून काही जण येतात आणि एक-दोन छोटे ड्रम भरून पाणी नेत आहेत. या हातपंपावर गरीब-श्रीमंत भेदही संपला. पाण्याचा जपून वापर न करणाऱ्या माणसांना आता पाण्याची किंमत कळलेली आहे. ‘जिंदगी की तलाश मे हम मौत के कितने पास आ गए’ हे हिंदी सिनेगीत कोणी गांभीर्यपूर्वक ऐकले नसेल, पण आता तेच शब्द खरे ठरलेत. पाण्याला जीवन संबोधणारी माणसे पाणी शोधत स्मशानात पोहोचलीत.