शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किंमती भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 11:57 AM

राज्य दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना पशुखाद्यांच्या किंमतीत दुप्पटीने भडकल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देपौष्टिक आहारात वाढ दुधाच्या किंमती भडकण्याची चिन्हे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य दुष्काळी स्थितीचा सामना करीत असताना पशुखाद्यांच्या किंमतीत दुप्पटीने भडकल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत. गोपालकांचा आर्थिक डोलारा गडगडण्याचा धोका वाढला आहे. यामुळे दुधाच्या किंमती भडकण्याची चिन्हे आहेत.दुष्काळी स्थितीने जनजीवनासोबत पशुधनावरही परिणाम झाला आहे. कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणीटंचाईसह चाराटंचाई निर्माण झाली आहे. आता पशुखाद्याच्या कच्या मालाच्या किमतीत वर्षभरात दुपटीने वाढ झाली आहे. ही दरवाढ पशुपालकांना झेपणारी नाही. यामुळे दुधाच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. येणाºया खरीप हंगामापर्यंत ह्या किमती अशाच राहण्याची शक्यता व्यावसायिक वर्तवित आहे.गतवर्षी मक्याच्या किमती १२ रूपये किलो होत्या. यावर्षी ही किंमत २५ ते ३० रूपयांपर्यंत वाढली आहे. सरकी १७०० रूपये क्विंटलवरून ३००० रूपये क्विंटलवर पोहोचली आहे. फल्ली पेंडचे दर ३० रूपयांवरून ४० रूपयांवर पोहोचले आहे. तुरीची चुरी १५०० रूपये क्विंटलवरून १९०० रूपये क्विंटलवर पोहोचली. सुग्रास हा पौष्टीक आहार १६०० रूपयांवरून २००० रूपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. पुढील काळात ह्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.पशुखाद्याचे सध्याचे दर पशुपालकांना परवडणारे नाही. या स्थितीत गोपालकांना जनावरांसाठी आहार पुरविणे अवघड झाले. ओला चाराही उपलब्ध होत नाही. यामुळे दुध उत्पादनही घटले आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्याने दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता गोपालक वर्तवित आहे. मात्र दुध डेअरी चालकांनी वाढीव दराबाबत मौन पाळले आहे. यामुळे दूध उत्पादकांची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.शासकीय डेअरीचे दूध संकलन घटलेविदर्भातील शासकीय डेअरीमधील दूध संकलन घटले आहे. त्यासोबतच खासगी डेअरीमधील संकलित दुधाचा आकडा घटला आहे. यामुळे दुहेरी नुकसानाचा सामना गोपालकांना करावा लागत आहे. यातून दुधाचे दर वाढविण्याची मागणी गोपालकांकडून होत आहे.तूर चुरीचा आलप म्हणून वापरपशुखाद्यामधील ढेपीचे दर सर्वाधिक महागडे आहे. त्याला पर्याय म्हणून तुरीच्या चुरीला सर्वाधिक मागणी आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले आहे. यामुळे दालमिल चालकांकडून तुरीच्या चुरीची खरेदी वाढली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ