लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील बागवाडी शिवारात पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गिट्टी क्रेशर सुरू केले आहे. या क्रेशरच्या धुळीमुळे परिसरातील जवळपास शंभर एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.सबंधित शेतकºयांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. शेतालालागून गिट्टी क्रेशरची परवानगी दिलीच कशी, याची चौकशी करण्यात यावी, शेतमाल नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राटदार पाटील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे या कंपनीने बागवाडी शिवारात शेत सर्वे नंबर ८४, ८५, ११७, ११८ मध्ये गिट्टी क्रेशर सुरू केले आहे. परंतु या क्रेशरपासून काही अंतरावर सायखेडा येथील २५ शेतकºयांची शंभर एकर शेती जमीन आहे. क्रेशरमधून निघणाºया धुळीमुळे या शेतकºयांच्या शेतातील पिकांचे दोन वषार्पासून नुकसान झाले. याबाबत शेतकºयांनी जाब विचारला असता पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने त्यांचे ऐकून न घेता उलट शासकीय काम आहे. विरोध कराल तर तुमच्यावर पोलीस कारवाईसुद्धा होऊ शकते, अशी दमदाटी केल्याचे शेतकºयांनी सांगितले.कंपनीचे अधिकारी ऐकून घेत नसल्याने शेवटी शेतकºयांनी तहसील कार्यालयात धडक देऊन पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास उपोषण, आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्रेशरची चौकशी करासदर कंपनीला गिट्टी क्रेशर तसेच गौण खनिज उत्खननासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या चौकशीची मागणी शेतकºयांनी केली आहे. शेतकºयांना पूर्वसूचना न देता सायखेडा ग्रामपंचायतीने गिट्टी क्रेशरसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गिट्टी क्रेशरमुळे शंभर एकरातील पीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:54 PM
लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : तालुक्यातील बागवाडी शिवारात पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गिट्टी क्रेशर सुरू केले आहे. या क्रेशरच्या धुळीमुळे ...
ठळक मुद्देशेतकरी संतप्त : पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरुद्ध तक्रार