शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

बचत गटांच्या हक्काचे १२२ कोटी साहित्य खरेदीत वळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2015 2:19 AM

केंद्र शासनाने राज्यातील बचत गटांना आहार पुरवठ्याच्या एक रुपया वाढीव दरापोटी दिलेले १२२ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाने

महिला व बालकल्याण : एक रुपया दरवाढीचा पैसायवतमाळ : केंद्र शासनाने राज्यातील बचत गटांना आहार पुरवठ्याच्या एक रुपया वाढीव दरापोटी दिलेले १२२ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाने साहित्य खरेदीत वळविल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील बचत गट यापासून अनभिज्ञच होते. मात्र या रकमेसाठी आता थेट विधिमंडळ पावसाळी अधिवेशनावर धडक देण्याची तयारी गावागावातील बचत गटांच्या महिला करीत आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून बचत गटांमार्फत अंगणवाडी केंद्रांवरून गरम आहार व नाश्त्याचा पुरवठा केला जातो. त्यापोटी प्रती लाभार्थी ४ रुपये ९२ पैसे मोबदला दिला जातो. हा दर परवडणारा नसल्याने त्यात वाढ करण्यात यावी, अशी बचत गटांची मागणी आहे. म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गरम आहाराचा दर एक रुपये प्रति लाभार्थी वाढविण्याचा निर्णय घेऊन निधीची मागणी केंद्र शासनाकडे केली होती. केंद्राने याची दखल घेत फेब्रुवारी २०१५ मध्ये राज्य शासनाला वाढीव एक रुपयापोटी १२२ कोटी रुपयांची रक्कम पाठविली. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला. भाजपा-सेना युतीची सत्ता स्थापन होऊन महिला व बालकल्याण खात्याची सूत्रे पंकजा मुंडे यांच्याकडे आली. केंद्राकडून प्राप्त झालेली १२२ कोटींची ही रक्कम नियमानुसार बचत गटांना देणे बंधनकारक होते. मात्र बचत गटांना अंधारात ठेवून ही संपूर्ण रक्कम परस्परच साहित्य खरेदीत वळविण्यात आली. त्यातूनच चिक्की, चटई, ताटवाटी यासारख्या साहित्याची खरेदी करण्यात आली. हीच खरेदी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून गाजते आहे. वाढीव दराला भाजपा आमदाराचे समर्थनवाढती महागाई व लागणारे परिश्रम लक्षात घेता गरम आहार पुरवठ्यासाठी प्रती लाभार्थी २० रुपये मोबदला देण्यात यावा, अशी मागणी राज्यभरातील महिला बचत गटांनी शासनाकडे केली आहे. त्यांची ही मागणी उत्तर नागपूरचे भाजपाचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी उचलून धरली आहे. बचत गटांना किमान १८ रुपये तरी प्रति लाभार्थी आहार पुरवठ्याचा दर द्यावा, अशी मागणी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. या मागणीचा ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)