शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

भीषण पाणीटंचाईतही बांधकामे जोरात

By admin | Published: May 27, 2016 2:08 AM

पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय

खासगी आणि शासकीयसुध्दा : नगरपरिषद-प्राधिकरण मेहेरबान यवतमाळ : पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्यासाठी नागरिक जीवतोड प्रयत्न करीत असताना यवतमाळ शहरात शासकीय आणि खासगी बांधकामांवर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उच्च न्यायालयाने दुष्काळी भागात बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले असले तरी यवतमाळ शहरात मात्र ठिकठिकाणी बांधकाम सुरू आहे. यवतमाळ शहरात कधी नव्हे ती यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निळोणा धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच धरण कोरडे पडले आहे. शहरात आठ दिवसाआड तेही जेमतेम पाणी मिळत आहे. शहरातील बहुतांश खासगी बोअरवेल आणि नगर परिषदेच्या मालकीचे बोअरवेलही कोरडे पडले आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी हाच चर्चेचा विषय आहे. थेंब न् थेंब साठविण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील बहुतांश भागात बांधकामांचा सपाटा आहे. यात शासकीय आणि खासगी बांधकामांचा समावेश आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर कंत्राटदार करीत आहे. तर नगरपरिषदेच्यावतीने नाल्या आणि सिमेंट रस्त्यांचे बांधकाम वेगात सुरू आहे. यासोबतच शहरात ठिकठिकाणी मोठ्ठाले अपार्टमेंट उभारण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. उन्हाळ्यात ही कामे थांबतील, असे वाटत होते. परंतु आजही त्याच गतीने शहरातील खासगी बांधकामे सुरू आहे. दारव्हा रोड, आर्णी रोड, धामणगाव रोड यासह विविध ठिकाणी बिल्डर मोठे मोठे अपार्टमेंट उभारत आहेत. यासोबतच शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे. अनेकांनी अपार्टमेंटच्या ठिकाणी खोदलेले बोअरवेल कोरडे पडले आहे. त्यामुळे ही मंडळी बाहेरुन पाणी आणत आहे. नेमके पाणी कोठून येते हे सर्वश्रृत असले तरी त्यांच्यावर कुणीही कारवाई करीत नाही. दुष्काळी परिस्थितीत बांधकाम थांबविण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम थांबविता येते, परंतु नगरपरिषदच शहरात रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करीत आहे त्यामुळे बिल्डरांना नोटीस देण्यास नगरपरिषदही पुढाकार घेत नाही. यवतमाळ शहराची भूजल पातळी खालावली आहे. अशा स्थितीत आणखी १५ दिवस पाऊस येण्याची चिन्हे नाही. निळोणा आटला आहे. चापडोहवर भिस्त आहे. भूगर्भातील पाणी बांधकामावर वापरले तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी) टँकरचे पाणी बांधकामावर पाण्याची उधळपट्टी थांबणार कधी ?यवतमाळ शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामावर रात्रीच्यावेळी टँकरने पाणी पुरविले जाते. पिण्याचे पाण्याचे कारण पुढे करून टँकर फुकटात भरले जातात. मात्र तेच पाणी दुप्पट दराने बांधकाम व्यावसायिकांना विकले जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या बांधकामावर रात्रीच्या वेळी फेरफटका मारला तर त्या ठिकाणी पाण्याचे टँकर पाणी ओततांना दिसून येतात. शहरातील विविध मंगल कार्यालय आणि लॉनवर पाण्याची उधळपट्टी होत आहे. हिरवळ टिकविण्यासाठी हजारो लिटर पाणी झाडांना दिले जात आहे. तर दुसरीकडे त्याच परिसरातील नागरिक मात्र गुंडभर पाण्यासाठी पायपीट करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर राजकीय पाठबळातून टँकर लॉनवर पोहोचत असल्याची माहिती आहे. पाण्याचा हा अपव्यय पाण्याची बचत सांगणारेच करीत असल्याचे दिसत आहे. शहरातील भीषण परिस्थिती बघता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची गरज आहे.