यवतमाळ : प्रलंबित समस्या निकाली काढाव्या या मागणीला घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या नेतृत्त्वात बुधवारी येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. १३ आॅक्टोबर रोजी प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने योग्य तोडगा न निघाल्याने धरणे देण्यात आले. कामगार करार, परिपत्रकाचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, रात्र मुक्कामी चालक-वाहक-यांत्रिक आणि महिलांसाठी सर्व सुविधांसह विश्रामगृहाची निर्मिती करा, वाहनाची स्पिड लॉक करणे थांबवा, वास्तववादी धाववेळ देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करा, वैद्यकीय रजा मंजूर करा, कामगिरीवर हजर असताना कामगिरी मिळू शकली नाही, अशा कर्मचाऱ्यांना हजेरी द्या, महिला कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करा, कार्यशाळा कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुरवा, सर्व वाहनास व्हेईकल टुल्स द्या, नियमबाह्य शिक्षा रद्द करा, कॅशलेस योजना सुरू करा, मंजूर संख्येनुसार कामगार भरती करा आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. विभागीय सचिव सदाशिव शिवनकर यांनी विभागीय प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. तिसरा टप्पा मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे २८ आॅक्टोबरला होणार आहे. यात कामगारांनी सहभागी होण्याची विनंती त्यांनी केली आहे. प्रसंगी अध्यक्ष खेमराज जावळेकर, प्रकाश देशकरी, राहुल धार्मिक, दिलीप पंधरे, प्रमोद उत्तरवार, एसटी बँक संचालक प्रवीण बोनगीरवार आदींनी मार्गदर्शन केले.या आंदोलनात मो. इश्तीयाक, शंकर ठाकरे, सहारे, दौलतकर, गावंडे, दत्ता उगले, साधनवाड, जानी, दादाराव चिबडे, इरफान खाँ, नितीन चव्हाण, सलिमोद्दिन शेख, संजय ठाकरे, शैलेश जगदाळे, अरुण वाघमारे, संदीप पेंदोर, गिरीधर चव्हाण, मुंजेकर, रत्नाकर मालेकर, रामजी राठोड, दत्ता खराडे, गुघाणे, इंचोलकर, विलास डगवार, विजय वानखेडे, केशव साळुंके, शंकर भालेराव, मनिष दुबे, सै. इरफान, उमेश चव्हाण, पंकज लांडगे, रामराव पवार, अमोल लढी, शे. लाल आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
एसटी कामगार संघटनेने दिले धरणे
By admin | Published: October 15, 2015 2:57 AM