शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

सावधान! उष्णतेचा धोका ६६ आरोग्य केंद्रात विशेष कक्ष

By विशाल सोनटक्के | Published: April 05, 2023 6:57 PM

 वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

यवतमाळ : वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यंदाही वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संंभवत असून नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. येथील जिल्हा नियोजन सभागृहात आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.

वातावरणातील बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, त्यासाठीची आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचा एकभाग म्हणून बुधवारी ही कार्यशाळा घेण्यात आली. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. सचिन दिवेकर व ङॉ. विजय डोंपले यांनी पॉवरपॉईंटद्वारे सादरीकरण केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानामध्ये या विषयाचा २०२१ मध्येच समावेश करण्यात आला आहे. वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या आजारांना समर्थपणे तोंड देता याावे यासाठी सर्व नागरिकांसाठी आणि विशेषत: लहान मुले, स्त्रीया, वृद्ध, आदिवासी आणि परिघावरील जनसमुहासाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाढत्या उष्णतेचा असा करावा सामनाउष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संभवतो. चक्कर येणे, सुस्त वाटणे, त्वचा लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी उष्माघाताची लक्षणे आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी, सरबत प्यावे, सैल कपडे घालावे, उन्हात जाताना रुमाल-टोपी, छत्रीचा वापर करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यशाळेला  मधुकर मडावी, डॉ. शाहू, डॉ. स्मिता पेठकर, डॉ. निलेश लिचडे आदींसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ