अनेकदा आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण होतो. रुग्णांना खासगीत औषधे आणावी लागतात. केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर, औषधी संयोजक यांचा अभाव आहे. चांगली आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे खासगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रुग्णवाहिकाही नादुरुस्त आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने येत्या १५ दिवसांत समस्या न सुटल्यास ‘डफली बजाव’ आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांमार्फत आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, नगरसेवक संबोधी गायकवाड, नगरसेविका बशनूर बी.सय्यद खलील, सीमा गायकवाड, मीना गायकवाड, रेखा पाईकराव, गोलू मूनेश्वर, गोंटू राऊत, अलीम कुरेशी, श्याम राऊत, भाऊ पाईकराव, किरण गायकवाड, आबा गायकवाड आदी उपस्थित होते.
040921\1621-img-20210904-wa0055.jpg
ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव ,वंचित बहुजन आघाडी करणार डफली बजाव आंदोलन*