हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे. डिमांड भरूनही विद्युत विभाग काही वीज द्यायला तयार नाही. जशी स्वत:च विहीर खणली, तशी स्वत:च वीज निर्मिती करावी का, गंभीर प्रश्न या शेतकºयापुढे निर्माण झाला आहे.तालुक्यातील जवळा गावातील हा गंभीर प्रश्न आहे. येथील पांडुरंग अर्जुन पारधी (६०) हा शेतकरी म्हणजे मेहनतीची मिसाल. १ मे १९७५ रोजी गुरुदेव सेवा मंडळाने जवळा येथे दादासाहेब सोळंके यांच्या नेतृत्वात विवाह मेळावा घेतला. त्यातच पांडुरंगचेही लग्न झाले. तो क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. आयोजकांनी ११ बक्षीसे ठेवली होती. यातील सर्वात मोठे बक्षीस पांडुरंगला मिळाले. चक्क सहा एकर शेतीची चिठ्ठी पांडुरंगच्या नावाची निघाली! मग काय! पांडुरंगच्या आनंदाला पारावार उरला नाही. या शेतीवरच त्याने आपल्या तीन मुलींचेही लग्न केले. आता आपल्या शेतात ओलिताची सोय असावी, असे हिरवे स्वप्न त्याला खुणावू लागले. त्याने विचार केला, आपल्या शेतात आपणच विहीर खोदली तर..!झाले, तो कामी लागला. त्याने स्वत:च विहिरीसाठी खोदकाम सुरू केले. त्याच्याकडे पाहून काही लोक टीका करू लागले. पण तो अखंड खोदतच राहिला. तीन वर्षात विहीर पूर्ण केली. आता पाहिजे वीज. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला गणेश मोरे यांनीही मदत केली. पण पांडुरंगचा अर्जच गहाळ केला. तरीही तो निराश झाला नाही. चौर्थ्यांदा अर्ज केला. तेव्हा कुठे विद्युत विभागाने त्याला डिमांड दिली. ती त्याने २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरली. डिमांड भरून आता वर्ष उलटले. तरीही वीज जोडणी काही मिळालेली नाही.पायपीट सुरूचपांडुरंगची पायपीट काही संपलेली नाही. तो स्वत: आमदार ख्वाजा बेग यांना भेटला. त्यांनी अधिकाºयांना त्वरित वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. यानंतरही वीज जोडणी देण्यात आलेली नाही, हे विशेष. तर दुसरीकडे याबाबत विद्युत कार्यालयात चौकशी केली असता, मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व शेतकºयांना वीज जोडणी देण्यात आली, असा दावा करण्यात आला.
एकट्याने खोदली विहीर, पण वीज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:00 PM
आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे.
ठळक मुद्देविद्युत विभागाची अनागोंदी : जवळा येथील मेहनती कास्तकाराची व्यवस्थेकडून थट्टा