प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. सध्याची निवासस्थाने ब्रिटीशकालीन आहे. कार्यालयीन वास्तू सोडल्यास स्वातंत्र्यानंतर पोलीस वसातहीची निर्मिती करण्यात आली नाही. सध्या या पोलीस वसाहतीत ३९ निवासस्थाने आहे. ठाणेदारांसाठी स्वतंत्र बंगला आहे. मात्र ३९ पैकीकेवळ १० पोलीस कुटुंबीय वसाहतीत वास्तव्यालाआहे. त्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन तेथे वास्तव्य करावे लागत आहे. उर्वरित ७० पोलीस कुटुंब शहरात भाड्याच्या घरात राहात आहे. वसाहतीची एवढी भयावह अवस्था झाली, की कोणताही कर्मचारी तेथे राहावयास तयार नाही. मूलभूत सुविधा नसल्यामुळे हे कर्मचारी शहरात भाड्याने घर घेऊन राहात आहे.पोलीस वसाहतीच्या छतावरील कवेलू फुटले आहे. त्यांचे तुकडे-तुकडे झाले आहे. लाकडी फाटे जीर्ण झाले. त्यामुळे पावसाळ्यात अक्षरश: घरात धारा लागतात. या वसाहतीत राहणारे कर्मचारी आपल्या घरावर प्लास्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. दारे, खिडक्यांची अवस्थाही जीर्ण झाली आहे. काही घरांच्या दारे, खिडक्या पूर्णत: तुटल्या आहे. शौचालय चोकअप झाले आहे. अनेक शौचालयांना तर दारेसुद्धा नाही. परिसरात काडीकचरा वाला आहे. गवताने वेढले आहे. त्यामुळे घरात कधीही सरपटणारे प्राणी येण्याची भीती सतत कायम असते.घरांच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहे. भिंती कधी कोसळतील याचा नेम उरला नाही. घरातील फरशा तर केव्हाच्याच उखडल्या. तीच अवस्था शौचालयांची आहे. नळांची पाईप लाईन ठिकठिकाणी लिकेज असल्यामुळे नळाला पाणीदेखील व्यवस्थित येत नाही. शौचालयांची दुरवस्था झाल्याने अनेक कर्मचाºयांना उघड्यावर जावे लागते. या वसाहतीला संरक्षक भींत नाही. सांडपाण्याचे व्यवस्थापन नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वास्तव्य करणाºयांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे.कुटुंबीय सतत दडपणाखालीपोलीस वसातहीला गाजर गवताने विळखा घातला आहे. त्यामुळे सरपटणाºया प्राण्याची सतत भीती असते. त्यात घरातील कर्ता पुरुष ड्युटीवर असतो. घरी केवळ महिला आणि मुले असतात. त्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. जनतेचे रक्षण करण्यात सदैव व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाºयांना घराकडेच लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सतत दडपणाखाली वावरते. कधी काय होईल, याचा कुणालाच भरवसा नसतो. ही समस्या कधी लोकप्रतिनिधींनी गंभीरपणपे घेतली नाही. त्यांनी नवीन पोलीस वसातहीसाठी कधी प्रयत्न केले नाही. त्यामुळे पोलीस वर्तुळातून खंत व्यक्त केली जात आहे.
दिग्रस पोलीस वसाहत दयनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:05 PM
येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे.
ठळक मुद्देरक्षणकर्तेच संकटात : भाड्याच्या घरात वास्तव्य, ब्रिटिशकालीन निवासस्थाने मोडकळीस