यवतमाळ : बालाजी चौकातील बालाजी दुर्गोत्सव मंडळाचे ५२ वे वर्ष आहे. मंडळाने बाहुबली चित्रपटातील महेशमती महालाची प्रतिकृती साकारण्याचे काम हाती घेतले. पाच ट्रक बांबू, एक ट्रक बांबूचे बॉटम, ४०० लिटर गोल्डन कलर, १० हजार मिटर कापडाचा वापर करण्यात आला. सिंहासनावर आरूढ दुर्गामाता, असे दृष्य मंडळ साकारात आहे. मंडळाचे अध्यक्ष रसिक मजेठीया असून सुभाष राय यांच्या नेतृत्वात अन्नदानाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होणार आहे.शिवाजीनगर दुर्गोत्सव मंडळाचे दुसरे वर्ष असून मंडळाने छोटा भीम मालिकेतील ढोलकपूर गाव साकारण्यास सुरूवात केली. छोटाभीम, टुनटुन मावशी, कालियासारखे पात्र साकारण्यात आले. त्याला विद्युत प्रवाहाने चलचित्रात रूपांतरित केले. चेतन नरडवार यांच्या नेतृत्वातील चमू हे काम करीत असून नानाभाऊ गाडबैले मंडळाची जबाबदारी पाहत आहे.सुभाष क्रीडा मंडळाचे ५२ वे वर्ष आहे. या मंडळाने केदारनाथ धामचे अद्भूत दृश्य साकारले आहे. भाविकांना ३० फूट उंच पहाड चढावा लागणार आहे. शिवलिंगाचे दर्शन घेऊन गुफेत देवीचे दर्शन होणार आहे. माँ दुर्गा शेषनागावर विराजमान होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय लंगोटे आहे.माँ एकवीरा दुर्गोत्सव मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या मंडळाने ५० फूट उंच शिवलिंगाचा देखावा साकारला. भाविकांना गुफेतून गेल्यावर १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होईल. ११ फूट उंच मातेची मूर्ती तीन सिंहावर आरूढ असेल. मंडळाचे अध्यक्ष अनिल वाघचोरे आणि उपाध्यक्ष अंकुश गुज्जलवार यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे.दारव्हा नाका येथील शिवराय दुर्गोत्सव मंडळाचे दुसरे वर्ष आहे. या मंडळाने शनिवारवाडा साकारणे सुरू केले. शंकराच्या जटेतून गंगा अवतरतानाचे दृश्य साकारले जात आहे. या जलाशयात कमळ फुल असून त्यात दुर्गेचे रूप साकारण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत वानखडे व नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांच्या नेतृत्वातील चमू काम पाहत आहे.छोटी गुजरीतील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४७ वे वर्ष आहे. मंडळाने फूल आणि हिरवळीवर इंद्रपुरी महाल साकारण्यास सुरूवात केली. १० हजार फुलांचे बंच या मंडळाने तयार केले आहे. याला हिरवळीची जोड देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष मनीष जयस्वाल आहे.संतोषी माता दुर्गोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंडळाने कोलकाता येथील तिरंगा मंदिर साकारण्यास सुरूवात केली. मंदिर ७० फूट उंच आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष राय या ठिकाणी काम पाहत आहे.सिद्धीविनायक नगरातील माँ जगदंबा दुर्गोत्सव मंडळाचे १६ वे वर्ष आहे. या मंडळाने राजस्थान पॅलेसचे भव्य रूप साकारण्यास सुरूवात केली. हा महाल ७० फूट उंच आहे. आर्णी मार्गावरील लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाचे ३१ वे वर्ष आहे. या मंडळाने देवीचे सगुण आणि निरगुण रूप साकारण्याचे काम हाती घेतले आहे. मंडळाचे अध्यक्ष निरंजन मानकर आणि डिझायनर किशोर अवसरे यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे.जयहिंद चौकातील जयहिंद दुर्गोत्सव मंडळाचे ५६ वे वर्ष आहे. येथे मयूर पॅलेस साकारत आहे. मोराचे पूर्ण रूप आणि महालात देवीची स्थापना हा अनोखा देखावा असणार आहे. मंडळाचे अध्यक्ष शेखर यनगंटीवार आणि पवन अराठे यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे. नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ४७ वे वर्ष आहे. या मंडळाने देवीचे महालक्ष्मी रूप आणि तिरूपती बालाजी, असा देखावा साकारण्यास सुरूवात केली आहे. मंडळ ३५१ अखंड दीप तेवत ठेवणार आहे.एसबीआय चौकातील समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या मंडळाने ६० फूट उंच केदारनाथ धाम साकारण्यास सुरूवात केली आहे. नीलेश ठाकरे आणि छोटू सवई यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे.
कष्टातून उभारताहेत दुर्गोत्सवाचे देखावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:56 PM