शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

13 हजार हेक्टरवरील धूळ पेरणी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 5:00 AM

जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामान विभागाने यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि शेतकरी पेरणीला लागले. पाऊस बरसायच्या आधीच १३ हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी आटोपली. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस लांबला. त्यामुळे धूळ पेरणी उलटण्याचा धाेका वाढला आहे. जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच  स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत लांबत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.विजेच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, वीजही अनेक भागात गूल राहात असल्याने ओलिताची सोय उरली नाही. अनेक शेतकऱ्यांना अर्धवट पाणी देता आले आहे. अपुऱ्या पाण्यात कपाशीचे बियाणे अंकुरले. मात्र, आता पावसाअभावी कोंब पिवळे पडत आहेत.  यातून शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याचा धोका आहे. मान्सूनची आगेकूच संथगतीने असल्याने अजूनही १०० मि.मी. पाऊस झाला नाही. अशा स्थितीत पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे. पुसद, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ,  दारव्हा, आर्णी, राळेगाव, पांढरकवडा आणि घाटंजी तालुक्यात कापसाची लागवड केली आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजाने घात- गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. काही शेतकऱ्यांनी एकरी उत्पन्न वाढावे म्हणून लवकर टोबणी केली. काहींनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी धावपळ केली. ही संपूर्ण घाई शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी. अधिक घाई झाली, तर त्याचा विपरित परिणाम होईल. शेतकऱ्यांनी पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी. - नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस