लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरातील सर्व शाळांना सुटी दिली आहे. मात्र अशाही परिस्थितीत यवतमाळ नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांना हजर रहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संताप आणि समाजात संसर्गाचा धोका वाढला आहे.नगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्या घोषित केल्या. नंतर हा आदेश खेड्यापाड्यातील शाळांनाही लागू करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये मात्र शिक्षकांनी सुटी घ्यावी की शाळेत यावे याबाबत संभ्रम होता. त्यावरही बरीच ओरड झाल्यानंतर शिक्षणाधिकारी दीपक चवने यांनी बुधवारी पत्र काढून शिक्षकांनीही घरीच थांबण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आता शाळेत जाणे टाळले आहे.मात्र यवतमाळ नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत कोणतेही निर्देश दिले नाही. उलट सकाळी ८ ते ११ पर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविले. सोमवार ते गुरुवार असे सलग चारही दिवस जिल्हाधिकाऱ्यांचा, शिक्षणाधिकाºयांचा आदेश डावलून पालिकेच्या शिक्षकांना शाळेत येऊन बसावे लागत आहे. दरम्यान शाळेत येण्याविषयी नगरपालिकेने जबरदस्ती केलेली नाही. मात्र मुख्याध्यापक आम्हाला येण्याविषयी आग्रह धरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्याचवेळी पुसदसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी मात्र पत्र काढून शिक्षकांनाही सुटी दिली आहे. यवतमाळातच शाळेची सक्ती का असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिका म्हणते, सक्ती नाही, जागृती करतोयदरम्यान नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ म्हणाले, शाळेत येण्याविषयी शिक्षकांवर सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र कोरोनाविषयक जनजागृतीसाठी शिक्षक उपलब्ध असावे हा पालिकेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे आमचे शिक्षकही आपआपल्या परिसरातील नागरिकांमध्ये कोरोना टाळण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करीत आहे. नगरपालिका शाळा परिसरातील नागरिकांना स्वच्छ हात धुण्याची सुविधा शाळांमार्फत उपलब्ध केली जात आहे.
कोरोनाच्या धास्तीतही पालिकेच्या गुरुजींची ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 6:00 AM
नगरपालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्या घोषित केल्या. नंतर हा आदेश खेड्यापाड्यातील शाळांनाही लागू करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये मात्र शिक्षकांनी सुटी घ्यावी की शाळेत यावे याबाबत संभ्रम होता. त्यावरही बरीच ओरड झाल्यानंतर शिक्षणाधिकारी दीपक चवने यांनी बुधवारी पत्र काढून शिक्षकांनीही घरीच थांबण्याचे निर्देश दिले.
ठळक मुद्देयवतमाळातील प्रकार : सकाळी ८ ते ११ हजेरी अनिवार्य केली, शिक्षकांच्या संतापानंतर प्रशासन नरमले