लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधीच संकटात सापडलेल्या जिल्ह््यातील शेतकऱ्यांना गारपीट व वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे रबीतील गहू, हरभरा, ज्वारीसह खरिपातील तूर पीकही हातचे जाण्याची भीती वर्तविली जात आहे. हजारो हेक्टरवरील रबी पिके बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकरी कोलमडले आहे.जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसऱ्या मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ८० टक्के पीक क्षेत्र नुकसानीच्या छायेत आले आहे. याचा सर्वात मोठा फटका कापसाला बसला आहे. काढणीला आलेला कापूस ओला झाला. आता त्याला कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाने हा कापूस काळवंडण्याचाही धोका आहे. यामुळे धाग्याची प्रत घसरून कापसाचे दर खाली घसरण्याचा धोका आहे. यामुुळे खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. पणन महासंघ ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारणार आहे. वातावरणातील आर्द्रतेने या केंद्रावर ओला झालेला कापूस अपात्र ठरणार आहे. असा कापूस खुल्या बाजारातच मातीमोल भावाने विकावा लागणार आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने तुरीवर अळीचा हल्ला झाल्याने बार करपत आहे. यामुळे तुुरीचे उत्पादनही घटणार आहे. अशीच अवस्था हरभऱ्याची आहे. हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला चढला आहे. हरभऱ्याची फुलगळ होत आहे. हळदीचे क्षेत्र मोठे आहे. बुरशी रोगाचे आक्रमण झाले आहे. हळद करपण्यास सुरूवात झाली आहे.उन्हाळी हंगाम लांबण्याचा धोकाअवेळी आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. तूर काढणीला यामुळे विलंब होणार आहे. कपाशीचे क्षेत्रही उशिरा रिकामे होण्याचा धोका आहे. यामुळे उन्हाळी भुईमूग लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महागाव तालुक्याला गारपिटीचा फटकामहागाव तालुक्यातील हिवरासंगम, सवना, गुंज, करंजखेड, थार, कवठा, वेणी, डोंगरगाव, वाकोडी, वाडी, मोरथ या गावांमध्ये गारांसह पाऊस झाला. सकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने गहू, रबी ज्वारी, कापूस, तूर, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खडका येथे शेकडो क्ंिवटल कापूस भिजला. कापूस खरेदी करण्यासाठी झालेल्या विलंबामुळे कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मारेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सरासरी ५.७० मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली. सर्वाधिक १५ मिमी पाऊस मारेगाव तालुक्यात कोसळला आहे. यवतमाळ ९.८७, बाभूळगाव ४.२०, कळंब ५.५४, दारव्हा ६.४६, दिग्रस ७.८८, आर्णी ०.६३, नेर २.७१, पुसद २.४७, उमरखेड १.४६, महागाव ४.३८, वणी ८.१२, झरी ८.५५, केळापूर ५.८३, घाटंजी ०.०७, राळेगाव २.८२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला आहे. त्यांंना पिकांच्या नुकसानीची चिंता सतावत आहे.प्रथमच हळदीला फटकाजिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. याच सुमारास निसर्ग प्रकोपाने हळदीला मोठा फटका बसला आहे. बुरशी रोगाच्या आक्रमणाने हळद मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होण्याची भीती वर्तविली जात आहे.
अवकाळी पावसाचा रबीला तडाखा, पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 6:00 AM
जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसºया मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.
ठळक मुद्देशेतकरी संकटात : महागाव तालुक्यात गारपीट, उमरखेड, आर्णी, घाटंजीत वादळी पाऊस