शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यवतमाळात पसरतेय माती खाण्याचे व्यसन

By admin | Published: December 29, 2015 8:25 PM

मातीवर आपल्या जिल्ह्याचे प्रेम. एक दाणा पेरून लाख दाणे उगविण्याची मातीची किमया सर्वज्ञात आहे. मातीची मूर्ती होते. मातीचे घरही होते. पण मातीतून नशाही येते म्हटले तर...!

अविनाश साबापुरे - यवतमाळमातीवर आपल्या जिल्ह्याचे प्रेम. एक दाणा पेरून लाख दाणे उगविण्याची मातीची किमया सर्वज्ञात आहे. मातीची मूर्ती होते. मातीचे घरही होते. पण मातीतून नशाही येते म्हटले तर...!होय, माती चघळून धुंद होणारी शेकडो माणसे आपल्याच यवतमाळात आहेत. माती आवडणे हा भाग वेगळा आणि माती खाण्याचे व्यसनच जडणे वेगळे. माती खल्ल्याशिवाय, चघळल्याशिवाय चैनच पडत नाही, असे सांगणारी ही माणसे माती प्रेमात नव्हे, व्यसनातच बुडाली आहेत.व्यसनासाठी चघळली जाणारी ही माती मात्र सर्वसाधारण नाही. दुधी पांढऱ्या रंगाची ही माती खास राजस्थानातून यवतमाळात आयात करण्यात येत आहे. या मातीचे ढोक ३-४ विक्रेते असून त्यांच्या माध्यमातूनच ही माती यवतमाळ व लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील दुकानांपर्यंत पोहोचविली जात आहे. शहरातील बांगरनगर, आर्णी रोड, धामणगाव रोड या परिसरातील दुकानांमध्ये ही दुधी पांढरी माती मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या मातीचे व्यसन करणारे लोक तिला ‘माला माती’ म्हणून ओळखतात. या मातीला चव नाही. गंध नाही. पण तिच्या सेवनाने संबंधिताला आनंद मिळतो. या मातीत कॅल्शियम असल्याने ही माती आरोग्याला घातक नाही, असे विक्रेते सांगतात. परंतु, माती चघळणाऱ्यांचे दिवसभरातील प्रमाण बघता ही माती घातक ठरण्याची शक्यता आहे. २५ ग्रॅम मातीची एक पुडी केवळ एक रुपयाला विकली जाते. एक व्यक्ती दिवसभरात दहा पुड्या खातो. म्हणजेच दिवसभरात पावभर (मुठभर) माती पोटात जाते. श्रमपरिहार करण्यासाठी अनेक जण दारूच्या आहारी जातात. दारूसाठी पैसे नसले की तंबाखूवरही लत भागवली जाते. पण कोणत्याही एका व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती व्यसनाचे निरनिराळे मार्ग शोधते. त्यातूनच यवतमाळात अनेकांना माती खाण्याचे व्यसन जडले आहे. अन्न व औषध प्रशासनाने या मातीचे परीक्षण करण्याची गरज आहे.