शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

जिल्ह्यात शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:34 PM

केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे,....

ठळक मुद्देपालकमंत्री : समता मैदानात प्रजासत्ताक दिन, पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.येथील समता मैदानात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात जवळपास १२०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाकरिता एकूण ४६८.६५ हेक्टर पैकी ३८१.२४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाकरिता १०६०.५० हेक्टर जमीन संपादित झाली आहे. १०० टक्के अनुदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू असून अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सन २०१८-१९ मध्ये एकूण ४९६ कोटींची तरतूद केली आहे. बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी मंजूर झाले आहे, असे ना. मदन येरावार यांनी सांगितले.शासन आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यावर्षी कीटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात एकही दुर्देवी घटना घडली नाही. हे शासन आणि प्रशासनाचे यश आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वीता ना.येरावार यांनी यावेळी मांडली. संचालन चंद्रबोधी घायवटे व ललिता जतकर यांनी केले.विद्यार्थी व शिक्षक, खेळाडूंचा गुणगौरव, सांस्कृतिक कार्यक्रमराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाकरिता निवड झाल्याबद्दल येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी अनिकेत काकडे व घाटंजी येथील माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी प्राजक्ता निकम हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते इन्स्पायर अवॉर्डने गौरविण्यात आले. शिक्षक अतुल ठाकरे, आपत्ती निवारण दिनानिमित्त आयोजित वादविवाद स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणारी वृषाली देशमुख, द्वितीय पुरस्कार स्वाती बाहे, तृतीय क्रमांक अजय जाधव यांच्यासह पत्रकार आनंद कसंबे, कलावंत गजानन वानखेडे, महेंद्र गुल्हाने, वंदना ठवळे, पद्माकर दुरतकर, सावित्रा वानखडे, राजू सुतार, नंदु मोहोड, बाळासाहेब पांडे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शेख नासीर रशिद, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता जितेंद्र सातपुते, गुणवंत खेळाडू (महिला) पूर्वा बोडलकर, गुणवंत खेळाडू (पुरुष) साहील भालेराव, गुणवंत खेडाळू (दिव्यांग) मितेश हरसुले, अमोलकचंद विधी महाविद्यालयातून एलएलबी करणारे दिव्यांग विद्यार्थी रामेश्वर चव्हाण आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार