ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपसभापती महादेव काळे, पंचायत समिती सदस्य विलास राठोड, स्वाती दरणे, पूजा शेळके, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, वनपरिक्षेत्राधिकारी विनय वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदगवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या कार्यात सर्व विभाग महत्वपूर्ण योगदान देतील. तशा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार रणजित भोसले यांनी तर, आभार सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांनी मानले. कार्यशाळेला कृषी विभाग, पंचायत विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी, सरपंच, प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी आणि गावकरी उपस्थित होते.
मनसंवर्धनानेच प्रभावी जलसंधारण शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:25 PM
ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ...
ठळक मुद्देअविनाश पोळ : कळंब येथे वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक