यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संशयिताचा आकडा सातत्याने वाढत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता ५६ कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. यवतमाळतील तायडेनगरात कोरोनाचे आठ संशयित असल्याची माहिती मिळाली. शहर पोलिस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने या संशयितांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मेडिकलमधून ३९ कोरोना संशयितांचे नमुने नागपूरला तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. यापैकी तीन नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहेत . या तिन्ही जणांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेची पाळत असणार आहे. आता उर्वरित नमुन्यांचा अहवाल काय येतो याकडे लक्ष लागले आहे.