यवतमाळ - मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ४ नेते आणि २६ उपनेत्यंची नेमणूक करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल त्यांनी उचलले आहे. शिवसेनेच्या ४ नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचीही नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले.
यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. गेल्या दि,२९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. तर मंगळवारी शिवसेनेचे ४ नेते आणि २६ उपनेते यांच्या नेमणूका त्यांनी जाहिर केल्या आहेत. शिवसेना नेतेपदी आनंदराव अडसूळ, रामदास कदम, भावना गवळी व गुलाबराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे, या नेतेमंडळींनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
शिवसेनेच्या नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी माझी निवड केली, त्यांचे मी आभार व्यक्त करते. एक शिवसैनिक ते खासदर असा माझा प्रवास असताना आता मला शिवसेना नेतेपदाची जवाबदारी दिली आहे ती मी भक्कमपणाने पार पाडेल. मी महिला खासदार म्हणून आतापर्यंत जी कामे केली आहेत, अश्या पद्धतीने पक्ष मजबूतसाठी जे मला करता येईल ते मी करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षमजबुतीसाठी काम करेल, असे भावना गवळी यांनी म्हटले.
शिवसेना उपनेतेपदी २६ जणांची नेमणूक
अनिल बाबर,दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया,श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा,चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक,संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत,सदा सरवणकर,राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.