ऑनलाईन लोकमतआर्णी : घरातील कर्ती माणसं वृद्ध झाली की त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणारी अनेक पोरं समाजात वावरताना दिसतात. या वृद्धांना घरापासून लांब ठेवले जाते. तेथे अगदी परक्याप्रमाणे ते जीवन जगतात. मायेचा ओलावा आटलेला असतो. मात्र या वृद्धांनाच मानाने लग्नात निमंत्रित करून त्यांना ‘खास’ वऱ्हाडी म्हणून सन्मान देणारेही समाजात आहेत, याची प्रचिती आर्णीत आली.तालुक्यातील ऊमरी पठार येथील संत दोलाराम महाराज वृद्धाश्रमात अनेक वृद्ध वास्तव्याला आहेत. शेषराव डोंगरे त्यांची मायेने शुश्रृषा करतात. गेल्या २६ वर्षांपासून ते या वृद्धांंचा सांभाळ करतात. सोमवारी या वृद्धांना प्रथमच लग्न मानाने लग्न सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली.सोमवारी येथील बाळासाहेब गिरी यांचा धाकटा मुलगा अक्षयचे लग्न होते. लग्नाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यांच्यासोबत वृद्धाश्रमातील ६० महिला, पुरुष या लग्नाचे खास पाहुणे होते.मंडपात सर्व वऱ्हाडी खाली बसले होते. मात्र या वृद्धांना विशेष खुर्चीवर बसविण्यात आले. बाळासाहेब गिरी व त्यांच्या पत्नी सुभाषिणी, वर अक्षय, त्याचा मोठा भाऊ अभिजित, त्याची पत्नी सोनाली, नववधू वैशाली यांच्यासह जावई, बहिणी या सर्वांनी वृद्धांना मायेचा ओलावा देत त्यांचा सत्कार केला. प्रत्येक वृद्धाजवळ जाऊन साष्टांग दंडवत घालत त्यांना कपडे दिले. मंगलाष्टकानंतर मानाची पंगत बसवून वृद्धाश्रमातील पाहुण्यांना सर्वप्रथम भोजन देण्यात आले. नंतरच इतर वऱ्हाड्यांना जेवण मिळाले.आदरातिथ्याने भारावलेलग्नातील आदरातिथ्याने सर्वच वृद्ध भारावून गेले. आपल्यांनी दुरावले, मात्र परक्यांनी आपुलकी दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा दिसून येत होती. गेल्या २६ वर्षांत कुणी असा सन्मानच दिला नाही, असे मनोगत शेषराव डोंगरे यांनी व्यक्त केले. वृद्धांच्या चेहऱ्यावर काही काळापुरते का होईना हास्य उमलावे म्हणून आपण हा सर्व खटाटोप केल्याचे बाळासाहेब गिरी यांनी सांगितले.
वृद्धांनी अनुभवला मायेचा ओलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:24 PM
घरातील कर्ती माणसं वृद्ध झाली की त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणारी अनेक पोरं समाजात वावरताना दिसतात. या वृद्धांना घरापासून लांब ठेवले जाते. तेथे अगदी परक्याप्रमाणे ते जीवन जगतात.
ठळक मुद्देअक्षय-वैशालीचा विवाह : ऊमरी पठार वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना खास वºहाडींचा सन्मान