लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेक पिढ्यांपासून वहिती करत असलेल्या शेतीचा वहिती दाखल्यासाठी वाघापूर(लासीना) येथील वृद्ध महिलेला महसूल विभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहे. यासंदर्भात वृद्ध महिला यमुनाबाई महादेव बोरकर यांनी येथील तहसीलदारांना निवेदन दिले आहे.वाघापूर(लासीना) येथील शेत गट क्र.४७ या शेतात मागील तीन पिढ्यांपासून बोरकर कुटुंब वहिती करीत आहे. दरम्यान, सदर प्रकरण वादग्रस्त झाले. त्यावर २०१४ मध्ये यवतमाळ येथील नायब तहसीलदारांनी यमुनाबाई महादेव बोरकर यांच्या नावाची नोंद गावनमुना सातबाराचे गावनमुना १२ मधील रकाना क्र.१५ मध्ये जमीन कसणाऱ्या व्यक्तीचे नाव नोंद करावे, असा आदेश दिला होता. यानंतरही ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. मात्र या शेतीवर बँकेकडून कर्जही दिले गेले. यमुनाबाई बोरकर यांनी त्याची वेळोवेळी परतफेडही केली. आता मात्र त्यांना वहितीचा दाखला देण्यास तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे.
वहितीच्या दाखल्यासाठी वृद्ध महिलेची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 9:51 PM