लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाच नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया शनिवारी पार पडली. पुसदमध्ये जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळाली. उमरखेडमध्ये नवीन चेहरे देण्यात आली. दिग्रसमध्ये सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र आली. आर्णी नगरपरिषदेत चारही पदांवर महिलांची निवड झाली. घाटंजी नगरपरिषदेत सर्व सभापती बिनविरोध निवडण्यात आले.पुसद पालिकेत जुन्यांनाच संधीपुसद : येथील पालिका सभापती पदाच्या निवडणुकीत जुन्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. जुन्याच सभापतींची पुनर्निवड करण्यात आली. शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी निवड बैठकीत सभात्याग केला.पालिका सभागृहात दुपारी ३ वाजता सभापती निवडीची बैठक झाली. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मुख्याधिकारी शेषराव टाले, यावेळी उपस्थित होते. आरोग्य सभापती पदी तिसऱ्यांदा अॅड. भारत जाधव तर पाणी पुरवठा सभापती म्हणून राजू दुधे यांची सहाव्यांदा निवड झाली. काँग्रेसच्या साबिराबी यांची बांधकाम सभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली. शिक्षण सभापती म्हणून इंदिराबाई गवळी तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी दीपाली धुळे यांची फेर निवड झाली.पुसद पालिकेवर राष्ट्रवादी व काँग्रेची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख फिरोज शेख अफसर यांचे जात प्रमाणपत्र हिंगोली येथील जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने खारीज केले होते. तरीही त्यांना निवडणुकीत सहभाग घेवू दिल्याने शिवसेनेने पिठासीन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेना व भाजपाच्या नगरसेवकांनी निवड सभेतून सभात्याग केला.उमरखेडमध्ये नवीन चेहरेउमरखेड : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदांसाठी शनिवारी नगरपरिषद सभागृहात निवडणूक झाली. यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या अयक्षतेखाली निवड सभा झाली. दुपारी १ वाजता नामांकन दाखल करणे सुरू झाले. सत्ताधारी शहर विकास आघाडी वगळता विरोधकांनी नामांकन दाखल न केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. सताधारी गटाची युती असलेल्या शहर विकास आघाडीतर्फे बांधकाम सभापती म्हणून भाजपाच्या कविता खंदारे यांची निवड झाली. आरोग्य सभापतीपदी भाजपाच्याच अनुप्रिता देव, तर पाणीपुरवठा सभापती म्हणून भाजपाचेच दिलीप सुरते यांची वर्णी लागली. शिक्षण सभापतीपदी भाजपाचेच प्रकाश दुधेवार, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या रेखा गवळे यांची निवड झाली. विद्यमान उपाध्यक्ष अरविंद भोयर यांची नियोजन समिती सभापतीपदी निवड झाली.स्थायी समिती सदस्य म्हणून मावळते आरोग्य सभापती तथा अपक्ष नगरसेवक अमोल तिवरंगकर आणि स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा, तसेच एमआयएमचे मुजीबुर रहेमान यांची वर्णी लागली. नगराध्यक्ष नामदेव ससाणे वगळता एमआयएमचे आठ, सताधारी भाजपाचे सात, शिवसेनेचे चार, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. महिलांना सहापैकी तीन समित्यांवर संधी मिळाली.घाटंजीत बिनविरोध निवडघाटंजी : येथील पालिकेच्या विषय समिती सभापतींची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली.नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात घाटंजी विकास आघाडीच्या नगरसेवकांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्याकडे पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद सोपविण्यात आले. बांधकाम सभापती म्हणून विजय नामदेव रामटेके, शिक्षण श्याम वसंतराव खांडरे, आरोग्य सीता अनंता गिनगाले, तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून सुवर्णा सदानंद गोमासे यांची निवड करण्यात आली. उपसभापती म्हणून वर्षा उईके यांची वर्णी लागली.आर्णीत महिला राजआर्णी : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती पदांसाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली.नगरपरिषदेच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. यात बांधकाम सभापतिपदी मंगला रमेश ठाकरे तर पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून अनिता सुनील भगत यांची निवड झाली. आरोग्य सभापती म्हणून सिंधू संतोष पारधी तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुषमा गजानन सुरटकर यांची निवड झाली. चारही समित्यांवर महिलांची वर्णी लागली. त्यामुळे आर्णी पालिकेत एक प्रकारे महिलाराज निर्माण झाले आहे. नवनिर्वाचित सभापतींचे साजीद बेग यांनी कौतुक केले.
पालिका समिती सभापतींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:53 PM
जिल्ह्यातील पाच नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया शनिवारी पार पडली. पुसदमध्ये जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळाली. उमरखेडमध्ये नवीन चेहरे देण्यात आली. दिग्रसमध्ये सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र आली.
ठळक मुद्देआर्णीत चारही पदांवर महिला : पुसदमध्ये जुन्या तर उमरखेडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी, घाटंजी नगर परिषद बिनविरोध