शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

जिल्हा बँकेला निवडणुकीचे वेध

By admin | Published: January 05, 2016 2:46 AM

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील याचिकेचा अडसर दूर होण्याची चिन्हे आहे. याचिका परत

यवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील याचिकेचा अडसर दूर होण्याची चिन्हे आहे. याचिका परत घेण्यासाठी पुसदमधून संचालकाचे समूपदेशन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सहकार प्रशासनाने ‘से’ दाखल करून याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे लवकरच बँकेच्या निवडणुका लागतील, अशी चिन्हे दिसत आहेत.जिल्हा बँक संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ केव्हाच पूर्ण झाला. या मंडळाने अतिरिक्त प्रभारात तीन वर्ष आणखी काढली. आठ वर्षांपासून कायम असलेल्या या मंडळींना संचालकाच्याच एका याचिकेने आधार दिला. परंतु आता या आधाराचा अडसर दूर होण्याची शक्यता आहे. बँकेच्या निवडणुका न झाल्याने संचालकांमागे विविध स्वरूपाच्या चौकशांचा ससेमिरा लागतो आहे, तुझ्या याचिकेचा नेमका फायदा कुणाला, असा कळीचा मुद्दा उपस्थित करून या याचिकाकर्त्या संचालकाचे पुसदमध्ये ज्येष्ठ नेत्याने समूपदेशन केले. त्यामुळे हा संचालक या याचिकेबाबत मवाळ भूमिका घेण्याची, एखादवेळी याचिका मागे घेण्याची शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे, तर दुसरीकडे अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या याचिकेवर काँक्रिट से दाखल करण्याची तयारी चालविली आहे.बँकेच्या जिल्हा गटातून पाच संचालक निवडून दिले जाणार आहे. त्यातून दोन महिला असतील. ओबीसी, एनटी, एससी-एसटीचे प्रत्येकी एक संचालक असतील. याशिवाय बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, दुग्ध संस्था, पगारदार संस्था यातून तीन संचालक निवडून दिले जाणार आहे. या जिल्हा गटातून मनिष पाटील, वसंतराव घुईखेडकर, रवींद्र देशमुख, आर.डी. राठोड, अनिरूद्ध लोणकर ही नावे चर्चेत आहेत. पगारदार संस्थेतून राजुदास जाधव यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय वेगवेगळ्या मतदारसंघातून अनेकांनी छुपी मोर्चेबांधणी चालविली असून ऐनवेळी त्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. बँकेचे बऱ्यापैकी हित पाहणाऱ्या प्रफुल्ल मानकर, सुरेश लोणकर, विनायकराव एकरे यांच्यासाठी सहकारात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)संचालकांनी लावली फिल्डींग, नवे चेहरे निवडणुकीत दिसणार ४निवडणुका लागण्याची चिन्हे पाहता संचालकांनीही फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. पुसदचे संचालक विजय चव्हाण यांनी बँकेच्या आगामी अध्यक्षपदाचे टार्गेट ठेवल्याचे सांगण्यात येते. सध्या २८ सदस्यीय असलेले बँकेचे संचालक मंडळ आता २१ चे होणार आहे. त्यामुळे विद्यमान सात संचालकांना आधीच बाद व्हावे लागणार आहे. उर्वरित संचालकांपैकी पाच ते आठ संचालक रिपिट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमरखेडमधून प्रकाश पाटील देवसरकर, पुसदमधून विजयराव चव्हाण, दिग्रस-आर्णीमधून संजय देशमुख रिंगणात राहतील. दारव्हामधून शंकरराव राठोडांऐवजी त्यांचा कोण वारसदार पुढे येतो याकडे नजरा लागल्या आहेत. वाढत्या वयामुळे शंकरराव राठोड आपला वारसदार पुढे करण्याची शक्यता आहे. यवतमाळातून बाबासाहेब गाडे पाटील, राधेश्याम अग्रवाल, बाळासाहेब मांगुळकर यांची नावे चर्चेत आहेत. अग्रवाल यांच्या नावाला मांगुळकरांचा सक्षम पर्याय ठरू शकतो. बाभूळगावमध्ये अमन गावंडे कायम असले तरी हिम्मतराव पांडे यांचे नावही स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. कळंबमध्ये प्रवीण देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. ते असल्यास बाबू पाटील वानखडे साईडला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राळेगावमध्ये प्रफुल्ल मानकर कायम आहेत. घाटंजी-पांढरकवडामध्ये प्रकाश मानकर, सुरेश लोणकर ही नावे आहेत. अण्णासाहेब पारवेकरांची एन्ट्री झाल्यास मानकर स्वत:हून साईडला होवून ओबीसीमधून नशीब आजमावू शकतात. स्थानिक बाजार समितीच्या राजकारणामुळे मानकर स्वत: पारवेकरांसाठी बँकेचा मार्ग सुकर करू शकतात. पूर्वी झरी, मारेगाव स्वतंत्र होते. आता ते एकत्र झाल्याने नरेंद्र बोदकुरवार, नरेंद्र ठाकरे, कर्मचारी नेते घनश्याम धोबे, नानासाहेब खंडाळकरांच्या परिवारातील महिला सदस्य आदी नावे चर्चेत आहेत. वणीमधून अ‍ॅड. विनायक एकरे, प्रकाश कासावार ही दोन नावे प्रामुख्याने पुढे आली आहेत.