अकोलाबाजारची वसाहत : अपघाताची भीती, बांधकाम थांबलेलोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : येथील वस्तीमधील घराचे छतावरून गेलेल्या वीज तारा आता नागरिकांसाठी धोकादायक झाल्या आहेता. घराचे बांधकाम जीव मुठीत घेऊन करावे लागत आहे. जोखीम नको म्हणून नागरिकांनी घराचे बांधकाम थांबविले आहे. गावात धोकादायक असलेल्या ११ केव्हीच्या तारा व कृषीपंपाचे रोहीत्र गावाबाहेर हटविण्याची मागणी होत आहे. आकोलाबाजार येथे नवीन गावठाण वसण्यापूर्वी कृषीपंपाकरिता ११ केव्हीची विद्युत लाईन टाकण्यात आली होती. गावात रोहीत्र बसविण्यात आले होते. आता विद्युत तारांच्या खाली वसाहत झाली आहे. त्याठिकाणी घरे बांधण्यात आली आहे. विद्युत तारांची उंची कमी असल्याने आणि तारा सैल झाल्यामुळे तारा लोंबकळून धोका होण्याची शक्यता बळावली आहे. या आधीही घराचे बांधकाम करताना विद्युत स्पर्शाने जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण या योजनेंतर्गत सुनील हिवराळे व अनिल हिवराळे यांचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. इतरही नागरिकांनी आपल्या घराची उंची वाढविणे अशक्य झाले आहे. घरावरून विद्युत तारा गेल्यामुळे इतर नागरिकांनाही आपल्या घरांवर चढून काम करणे धोकादायक झाले आहे. या ११ केव्हीच्या विद्युत तारा व विद्युत रोहीत्र गावाबाहेर हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीज वितरणचे दुर्लक्षअकोलाबाजारसह परिसरातील विजेच्या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. अनेक गावातील डीपी सताड उघड्या असून फ्यूज तारांच्या नावाखाली जाड तार टाकले आहे. तसेच अनेक गावातील वीज तारा लोंबकळत असून घर्षण होवून ठिणग्या पडतात.
घरांवरून वीजतारा
By admin | Published: July 10, 2017 1:05 AM