लोकमत न्यूज नेटवर्कसाखरा (को.) : साखरा व परिसरातील इतर गावात वीज वितरण कंपनीतील अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता अनधिकृत व्यक्तींकडून कामे करवून घेत असल्याचे दिसून येत आहे. तर लाईनमन मात्र घरी बसून पगार घेत असल्याचा प्रकार परिसरात सुरू आहे. याकडे वीज वितरणच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण भागात विद्युत देखरेखीसाठी लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच काही लाईनमन आपल्या घरी बसून खेड्यातील एखाद्या विद्युतमध्ये बिघाड झाला, तर मदतनीस म्हणून अनधिकृत व्यक्तीकडून कामे करून घेण्याची पद्धत संपूर्ण परिसरात सुरू आहे. खेड्यातील वीज पुरवठा बंद झाला, तर आॅनलाईन तक्रार करण्यास महावितरण सांगतात. मात्र नागरिकांना तेथे तक्रारही करता येत नाही. अशावेळी लाईनमन हा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीला थोडा फार मोबदला देऊन त्यांच्याकडून काम करून घेत आहे. यात एखादा अपघात झाला, तर त्याला महावितरण जबाबदार राहणार काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे व ग्राहकांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी होत आहे.
वीज कामे खासगी व्यक्तीकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:25 AM
साखरा व परिसरातील इतर गावात वीज वितरण कंपनीतील अनेक कर्मचारी मुख्यालयी न राहता अनधिकृत व्यक्तींकडून कामे करवून घेत असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देमहावितरणचा कारभार : अधिकृत कर्मचारी घेतो घरी बसून वेतन