लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सातत्याने जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर लादल्या जाणाºया अशैक्षणिक कामांमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. अशा अशैक्षणिक कामांचा विरोध करण्यासाठी शिक्षक संघटना एकवटल्या असून २ आॅक्टोबरला तालुकास्तरावर तर ७ आॅक्टोबरला जिल्हास्तरावर धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे.अशैक्षणिक कामांच्या विरोधासाठी विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत गुरुवारी जिल्हा परिषद परिसरात सभा घेतली. यावेळी समन्वय कृती समिती तयार करून आंदोलनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांना शासनाने आॅनलाईन कामासाठी लागणाºया कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. कामाची सक्ती मात्र करण्यात येत आहे. यासाठी शासनाने संगणक आॅपरेटर, इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या. तसेच शालेय पोषण आहारासाठी धान्यादी मालाची खरेदी करण्याच्या धोरणात बदल करावा यासह इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी समन्वय कृती समिती तयार केली आहे. या समितीच्या वतीने गांधी जयंतीच्या दिवशी २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक तालुका स्तरावर दुपारी १ ते ५ या वेळात धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. तसेच ७ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरावर सत्याग्रह करण्याचा निर्णय गुरुवारच्या सभेत घेण्यात आला आहे.आंदोलनाचे समन्वयक म्हणून रवींद्र कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. सभेला ज्ञानेश्वर नाकाडे, मधुकर काठोळे, साहेबराव पवार, सुभाष धवसे, रमाकांत मोहरकर, सतपाल सोवळे, किरण मानकर, दिवाकर राऊत, महेंद्र वेरुळकर, गौतम कांबळे, गजानन देऊळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पुरूषोत्तम ठोकळ यांनी केले. आभार गजानन पोयाम यांनी मानले.
अशैक्षणिक कामांविरुद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 9:20 PM
सातत्याने जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर लादल्या जाणाºया अशैक्षणिक कामांमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देसंघटना एकवटल्या : २ आॅक्टोबरला तालुकास्तरावर देणार धरणे