संघर्ष समिती : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन यवतमाळ : अनुकंपाधारकांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अनेक अनुकंपाधारक उमेदवार आंदोलनात सहभागी झाले होते. सध्या १० टक्केनुसार अनुकंपाधारकांना शासन सेवेत सामावून घेतले जात आहे. यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वच अनुकंपाधारकांना शासन सेवेत सहभागी करण्यात यावे. यामुळे अनुकंपाधारक कुटुंबावर कुठलाही अन्याय होणार नाही. याची दखल शासनाने तत्काळ घ्यावी. याबाबतचे निवेदन संघर्ष अनुकंपाधारक संघटनेच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डी.के.हनवते, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार डोंगरे, बाबासाहेब शिंदे, गोविंद मेश्राम, अमोल पोहरे, पुनम राठोड, आशा आंबाडे, सोनाली नरवाडे, युवराज गायकवाड, नीलेश कावलकर, सायली सोमन, सतीश आळने, राजू जोगदंडे, महेंद्र कांबळे, तुषार काळे, लौकिक बोढाले, विजय रत्ने, अक्षय ठाकरे यांच्यासह अनेक अनुकंपाधारक उमदेवार उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घ्या
By admin | Published: July 30, 2016 12:58 AM