शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
2
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
3
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
4
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
5
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
6
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
7
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
8
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
9
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
10
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
11
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
12
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
13
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
14
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
15
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
16
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
17
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
18
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
19
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे

‘झेड’पी अध्यक्षांना कर्मचाऱ्यांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्याने चक्क अध्यक्षांच्या जवळच्या संस्थेची फाईल बासनात गुंडाळून त्यांना झटका दिला. यामुळे जिल्हा परिषदेत चर्चेला पेव फुटले.आर्णी येथे एक मूकबधीर निवासी शाळा आहे. जिहा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांचे पती या संस्थेचे अध्यक्ष असून त्यासुद्धा संस्थेच्या संचालक असल्याचे सांगितले जाते. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ...

ठळक मुद्देफाईल गुंडाळली बासनात : आर्णीच्या निवासी शाळेचे मूल्यनिर्धारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्याने चक्क अध्यक्षांच्या जवळच्या संस्थेची फाईल बासनात गुंडाळून त्यांना झटका दिला. यामुळे जिल्हा परिषदेत चर्चेला पेव फुटले.आर्णी येथे एक मूकबधीर निवासी शाळा आहे. जिहा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांचे पती या संस्थेचे अध्यक्ष असून त्यासुद्धा संस्थेच्या संचालक असल्याचे सांगितले जाते. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व सोपस्कार करून समाजकल्याण विभागाकडे मूल्यनिर्धारणाची फाईल टाकली. मात्र एका कर्मचाऱ्याने त्यात अनेक त्रुटी काढून ती बासनात गुंडाळून ठेवली. त्यात सदर नस्ती लिगल कागदावर योग्य स्वरूपात सादर करावी, असे नमूद केले. ही फाईल बासनात गुंडाळून ठेवल्याचे माहित होताच अध्यक्षांच्या वर्तुळात खळबळ उडाली.फाईल बासनात गेल्याचे लक्षात येताच अध्यक्षांच्या स्वीय सहायकांची तारांबळ उडाली. त्यांनी संबंधित कर्मचाºयाशी संपर्क साधून फाईलबाबत विचारणा केली. तरीही संबंधित कर्मचाऱ्याने निगरगट्टपणे उत्तरे दिली. मात्र ती फाईल परिपूर्ण असल्याचे सांगितले गेले. तरीही कर्मचाऱ्याने ती बासनात गुंडाळल्याने अध्यक्षांच्या वर्तुळात संताप व्यक्त केला गेला. अखेर काही वेळातच ती फाईल अध्यक्षांच्या कक्षाकडे परत आली. आता त्रुट्या दुरूस्त करून ती फाईल पुन्हा समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. ही फाईल निकाली निघून बुधवारी सायंकाळपर्यंत परत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.पदाधिकाऱ्यांपेक्षा कर्मचारीच वरचढआर्णीची फाईल त्रुट्या काढून बासनात गुंडाळल्याने पदाधिकाऱ्यांपेक्षा कर्मचारी वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये एकसूत्रता नसल्याने अधिकारी, कर्मचारी वरचढ झाल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले. आता नवीन सीईओ येऊनही त्यात फरक पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे पदाधिकाºयांचा वचक संपल्याची चर्चा आहे.सीईओंनी केले कामकाज सुरूनवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारपासून फाईली निकाली काढण्याचे काम सुरू केले. मंगळवारी त्यांनी विविध फाईली तपासून त्यावर प्रथमच स्वाक्षरी केल्याचे सांगितले जाते.