रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सर्व सांडपाणी वाहून तलावफैलातील तलावात गोळा होते. या तलावाला आणि तलावातील पाण्याला सुरक्षित करण्यासाठी साैंदर्यीकरणाची योजना हाती घेण्यात आली. योजना अर्ध्यावरच थांबली. पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नाल्याची नाली झाली आहे. यातून पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील मुबलक पाण्याच्या विहिरीही दुर्लक्षित धोरणाने बुजविल्या गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करून पाण्याचे प्रवाह प्रभावित झाले आहे.
हे घ्या पुरावे !
शहरातील तलावफैल परिसरात पूर्वी एक प्राचीन विहीर होती. या विहिरीवर आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढल्याने ती बुजविण्यात आली. आता याठिकाणी देवीचे मंदिर आहे.
प्राचीन मंदिराच्या मागील बाजूला मुबलक पाण्याची विहीर आहे. या ठिकाणावरून शहराला पाणीपुरवठा होत होता. या ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्याने ही विहीर असुरक्षित झाली आहे.
शहरातील पाणी साठविणाऱ्या तलावात जाणारा पाण्याचा प्रवाह अतिक्रमणामुळे प्रभावित झाला आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याने नाली तयार झाली आहे.
नाल्याच्या सुरक्षा भिंतीचं काम अर्ध्यावरच
- शहरातील अतिक्रमणाला रोखण्यासाठी नाल्याच्या काठावर सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. - मात्र, ही सुरक्षा भिंत अर्ध्यावरच सोडून देण्यात आली. नाल्यामध्ये उपसलेला गाळ तसाच ठेवण्यात आला आहे. यातून नाल्या अरूंद झाल्या आहेत.
पालिका प्रशासन बिनधास्तयवतमाळ शहरातील नाल्याच्या काठावर वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत नगर परिषद प्रशासन बिनधास्त आहे. दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्याने नाल्यातून पाण्याचा प्रवाह पुढे जाताना अडचणी येत आहेत. याशिवाय अनेक झुडुपेही सुरक्षा भिंतीवर वाढले आहे. या सर्व बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष अन् राजकारण...
नैसर्गिक प्रवाह जोपासणे काळाची गरज आहे. हे प्रवाह दूषित झाले तर त्याचा परिणाम सर्वांवरच होणार आहे. यामुळे प्रवाहाला दूषित होण्यापासून संरक्षित केले पाहिजे. याशिवाय वृक्षांची लागवड करून पर्यावरण समृद्ध केले पाहिजे. - डाॅ. विजय कावलकर
शहरातील वाढत्या अतिक्रमणाला प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. याशिवाय, राजकारणातूनही अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासोबतच अतिक्रमण मुक्त करण्याचं कामही प्रशासनाचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे.- निखिल राऊत