लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : कोट्यावधी रुपये खर्चून शासन व नगरपंचायतीने चांगले मजबूत डांबरी व सीमेंट रस्ते बांधले. पादचाऱ्यांकरिता पादचारी रस्ते बांधून दिले. मात्र अवघ्या सहा महिन्यांत या सर्वच मार्गालगतचे फूटपाथ दिसेनासे झाले आहे. अतिक्रमणधारकांनी या सर्वच रस्त्यांवर दुकाने थाटून पादचाऱ्यांचे मार्ग अडविले आहे.कोट्यवधींच्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. सरकारी जागा, नगरपंचायतीच्या जागा अनेकांनी फुकटात बळावल्या आहे. वरून फुटपाथच्या जागा भाडेकरू, पोटभाडेकरूंना भाड्याने देणे, दुहेरी उत्पन्न मिळविण्याचे मार्ग शोधले जात आहे. या दुकानांमुळे व दुकानासमोर उभे राहणाºया वाहनांमुळे मुख्य मार्ग व बसस्थानक परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. परिणामी कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.खासगी प्रवासी वाहनांची वर्दळ येथे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाहने २०० मीटर परिसरात प्रतिबंध असताना सर्रास बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात उभी केली जातात. तेथेच वाहनात प्रवासी चढविले, उतरविले जातात. वाहने मागे-पुढे घेणे, कट मारणे असे प्रकार सर्रास सुरू असतात. यात बसस्थानकात येणाºया-जाणाºया बसेस व इतर वाहनांना मार्ग काढण्यास विलंब होतो. त्यातच मधात असलेल्या रोड डिवायडरवर रिकामटेकडे वेळोवेळी बसून राहतात. त्यानेही वेगळ समस्या निर्माण होते.मुख्य रस्त्यावर अनेक लहान-मोठी वाहने सतत जाणूनबुजून उभी ठेवली जाते. यातून वाहतुकीचा मार्ग रोखला जातो. काही ठिकाणी सीमेंट रोडच्या मधातील रोड डिवायडर जाणूनबुजून आपआपल्या फायद्यासाठी तोडले गेले. अनेक ठिकाणी सीमेंट रस्त्याने फूटपाथ मुरूम टाकून आपापल्या दुकानात जाण्यास रस्ता तयार केला गेला. यातही राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक व पादचाऱ्यांचा रस्त्यावर परिणाम झाला आहे. राळेगाव पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी एकदा फूटपाथ मोकळे केले. मात्र त्यावेळी अनेकांना अभय देण्यात आले होते. आता तर पूर्ण फूटपाथ ‘जैसे थे’ झाले आहे.वाचनालय गायबच झालेबसस्थानकालालागूनच महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाची इमारत आहे. फुटपाथवरील दुकानामुळे ही इमारत व वाचनालय दिसेनासे झाले आहे. ३८ वर्ष जुन्या असलेल्या या वास्तूत १२ हजार पुस्तके आहे. वाचक, विद्यार्थी, एमपीएससी, यूपीएससीचे अभ्यासक येथे दररोज भेट देतात. मात्र अतिक्रमणामुळे त्यांना येण्या-जाण्यास मार्गच उरलेला नाही. येथील अतिक्रमण काढण्याची मागणी आहे. नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे सौंदर्य अतिक्रमणात लोप पावले आहे.
राळेगावात कोट्यवधींच्या रस्त्यांवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 9:16 PM
कोट्यावधी रुपये खर्चून शासन व नगरपंचायतीने चांगले मजबूत डांबरी व सीमेंट रस्ते बांधले. पादचाऱ्यांकरिता पादचारी रस्ते बांधून दिले. मात्र अवघ्या सहा महिन्यांत या सर्वच मार्गालगतचे फूटपाथ दिसेनासे झाले आहे. अतिक्रमणधारकांनी या सर्वच रस्त्यांवर दुकाने थाटून पादचाऱ्यांचे मार्ग अडविले आहे.
ठळक मुद्देपादचारी मार्ग गिळंकृत : सामान्य ग्राहकांना त्रास, वाहतुकीला अडथळा