लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील आर्णी मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामात अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झाला होता. बांधकाम विभागाच्या कारवाई विरोधात अतिक्रमणधारकाने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या बाजूने निकाल दिला. या निकाला विरोधात वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली. तेथेही निकाल कायम ठेवण्यात आला. याच आदेशावरून बांधकाम विभागाने शुक्रवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.नगरपरिषदेच्या वडगाव विभागीय कार्यालयापासून ते साईश्रध्दा हॉस्पीटलपर्यंत विरूद्ध दिशेच्या बाजूला रस्त्यावर अतिक्रमण होते. यामुळे १९० मीटर रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबले होते. बांधकाम विभागाच्या कारवाई विरोधात दीपक गुल्हाने व ज्ञानेश्वर गुल्हाने यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांचे अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्रा इतरांनी घेतला.त्यामुळे काम थांबवले होते. न्यायालयाचा आदेश मिळताच बांधकाम विभागाने तत्काळ यंत्रणा सक्रिय करून अतिक्रमण असलेल्या दोन मोठ्या इमारतीवर हातोडा चालवला. त्यासोबतच इतरही अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. आता उर्वरित रस्ता रूंदीकरणाचे काम त्वरित सुरू केल जाईल, असे उपअभियंता प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी अवधुतवाडी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
अखेर आर्णी मार्गावरचे अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 8:53 PM
शहरातील आर्णी मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामात अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झाला होता. बांधकाम विभागाच्या कारवाई विरोधात अतिक्रमणधारकाने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या बाजूने निकाल दिला.
ठळक मुद्देवडगावचा १९० मीटर रस्ता मोकळा : दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई