शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

प्रत्येकाने घ्यावा कलाम यांचा आदर्श

By admin | Published: October 17, 2015 12:41 AM

ए.पी.जे.अब्दुल कलाम अतिशय सामान्य कुटुंबातील असतानासुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत ते पोहचू शकले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रात तब्बल ३० वर्षे त्यांनी सर्वोच्च पदावर काम केले.

सचिंद्रप्रताप सिंह : बचत भवन येथे वाचन प्रेरणा दिन साजरायवतमाळ : ए.पी.जे.अब्दुल कलाम अतिशय सामान्य कुटुंबातील असतानासुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत ते पोहचू शकले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रात तब्बल ३० वर्षे त्यांनी सर्वोच्च पदावर काम केले. साधी राहणीमान आणि चांगले विचार तसेच परिश्रमामुळेच ते यशस्वी होऊ शकले. त्यांचा हा आदर्श प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बचत भवन येथे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपलजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संतोष पाटील, संदीप महाजन, फडके, विजय भाकरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अब्दुल कलाम लहानशा कुटुंबातील असतानाही त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत उत्कृष्ठ कार्य करून समाजास चांगला संदेश दिला आहे. ते वैज्ञानिक असतानासुद्धा त्यांनी सामाजिक कामात प्रोत्साहन दिले. समाजकार्य करणाऱ्यांना ते प्रोत्साहन देत, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पूर्ण जीवनात युवकांना प्रोत्साहित केले. स्वप्न बघा आणि पूर्ण करा. त्यासाठी परिश्रम करा असा संदेश ते नेहमीच युवकांना देत. अब्दुल कलाम यांनी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले. युवकांनी त्यांचा आदर्श घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सुरूवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी उपस्थित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. सूत्रसंचालन बिजवे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)