सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ईव्हीएमबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित होत असताना मतदानाची प्रक्रिया पारदर्शकरीत्या सुरू केली जाते. यासाठी ‘मॉक पोल’ प्रमाणपत्र व अभिरुप मतदान घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दीड तासापूर्वी अभिरुप मतदान करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाणार आहे.मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ईव्हीएममध्ये उमेदवाराला दिलेले मत योग्य पद्धतीने नोंदले जाते की नाही, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी व ईव्हीएममधील मत याची पडताळणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला ‘मॉक पोल’ संबोधल्या जाते. याची सुरुवात अभिरुप मतदान घेऊन होते. रिंगणात असलेले एकूण उमेदवार व नोटा या सर्वांना समान मतदान करून नंतर त्याची पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया किमान दोन उमेदवाराचे प्रतिनिधी असताना सुरू केली जाते. सकाळी ५.३० वाजता मॉक पोलची वेळ निश्चित केली आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष करून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने मॉक पोल प्रमाणपत्र तयार केले जाते. या प्रमाणपत्रानंतरच सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दीड तासापूर्वी पुढील मतदान योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठीच मॉक पोल घेतला जातो. एकंदर प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश आयोगाकडून असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.किमान ५० मते टाकणे बंधनकारकमॉक पोल व अभिरुप मतदानासंदर्भात उमेदवाराने नेमलेल्या मतदान केंद्र प्रतिनिधीच्या कार्यशाळेत माहिती दिली जाते. तसेच या सर्व प्रतिनिधींना सकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यांच्या समक्षच किमान ५० मते समान पद्धतीने टाकून पडताळणी केली जात असल्याची माहिती यवतमाळ विधानसभा निवडणूक अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दिली.
Maharashtra Election 2019; मतदानाच्या दीड तासापूर्वी होणार ईव्हीएम पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 2:07 PM
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दीड तासापूर्वी अभिरुप मतदान करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाणार आहे.
ठळक मुद्दे‘मॉक पोल’ प्रमाणपत्र अनिवार्य सकाळी ५.३० वाजता सुरू होणार प्रक्रिया