शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

नाममात्र रॉयल्टीवर हजारो ब्रास मुरूमाचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 5:00 AM

थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदानीतून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून हजारो ब्रास मुरुम खोदुन नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी तर, ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजारहून ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. विशेष म्हणजे दोन किंवा तीन गाड्यांना वाहतूक परवाना असताना आठ ते दहा गाड्या मुरुम वाहतुकीसाठी वापरल्या जातात.

ठळक मुद्देकंटूर मॉपने मोजणी झाल्यास होणार चोरी उघड

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास गौण खनिजाच्या उत्खननाचा गोरखधंदा कळंब शहरात अनेकांनी सुुरू केला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदान सफाचट करण्याचे काम गौण खनीज माफियाकडून केले जात आहे. या प्रकरणी सरपंचाने केलेली तक्रारही दुर्लक्षित आहे.थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदानीतून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून हजारो ब्रास मुरुम खोदुन नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी तर, ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजारहून ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. विशेष म्हणजे दोन किंवा तीन गाड्यांना वाहतूक परवाना असताना आठ ते दहा गाड्या मुरुम वाहतुकीसाठी वापरल्या जातात. यातून हजारो ब्रास मुरुमाची चोरी केली जाते. मुरुमाची रॉयल्टी भरुन वाहतूक पास काढली जाते. ठराविक वेळ व दिवसासाठी ही पास असते. परंतु विविध कारणे देऊन याचा कालावधी वाढवून घेतला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली जाते. नाममात्र रॉयल्टीवर मोठ्या प्रमाणात मुरुम खोदून नेण्यात आल्याची तक्रार थाळेगावचे सरपंच दिनेश वानखडे यांनी तहसील कार्यालयात केली. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून चौकशीची मागणी केली.कंटूर मॉपने मोजणी झाल्यास होणार चोरी उघडथाळेगाव खदानीतून लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आले, हे कोणापासूनही लपून नाही. हे सिध्द करायचे असले तर खदानची कंटूर मॉपने मोजणी करणे गरजेचे आहे. त्यानंतरच किती रॉयल्टी भरण्यात आली व किती मुरुमाची चोरी झाली हे स्पष्ट होईल.गौण खनिजाच्या चोरीची तक्रार प्राप्त झाली आहे. महसूल विभाग यावर लक्ष ठेवून आहे. यापुढे चोरी होणार नाही यादृष्टीने उपाययोजना होईल.- राजेश कहारे,प्रभारी तहसीलदार, कळंब

टॅग्स :Excavationउत्खनन