दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शासनाचा वन विभाग व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. तालुक्यातही विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली. मात्र लागवडीनंतर तेवढ्याच काळजीने देखभालीचे काम वन विभागाने केले नाही. परिणामी उमरखेड-ढणाकी, उमरखेड-पुसद रस्त्याच्या काठाने पावसाळ्यात लावण्यात आलेली झाडे आता दृष्टीस पडणे कठीण झाले आहे. या वृक्षांची आवश्यक ती देखभाल न झाल्याने जिवंत झाडांची संख्या बोटावर मोजण्याइतपच आहे. वन विभागानचे अनेक वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत अनेकदा उमरखेडला आले. मात्र त्यांचेही या गंभीर समस्येकडे लक्ष गेले नाही.वन विभाग दरवर्षी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र त्याच प्रमाणात वृक्ष संगोपनाची काळजी ोतली जात नाही. वृक्षांच्या देखभालीवरही शासन कोट्यवधींचा खर्च करते. मात्र त्याची फलश्रृती काय, असा प्रश्न कायम आहे.उमरखेड तालुक्यात वन विभागाच्या वरिष्ठांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाची पाहणी केल्यास भयावह सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. वृक्ष जगले नाही. त्यामुळे लागवड केलेले वृक्ष कमकुवत होते काय, तयार करण्यात आलेले खड्डे बरोबर होते किंवा नाही, याची तपासणी होणे गरजेचे झाले आहे. सर्वच जर व्यवस्थित होते, तर लागवड केलेल्या ठिकाणचे वृक्ष मृत्तावस्थेत कसे, असा प्रश्न आहे. या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाकडे होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे.वन विभागाचा कारभार ‘रामभरोेसे’स्थानिक पातळीवर वन अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंगत एकोपा नाही. त्यामुळे येथील वन विभागाचा कारभार एकतर्फी आणि रामभरोसे सुरू आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने येथील अधिकारी, कर्मचारी सुस्तावले आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही वनसंपदा वाढण्याचे नाव घेत नाही. उलट लावलेली झाडेही जगविली जात नाही. लागवडीनंतर त्यांचे संगोपन केले जात नाही. याची प्रत्यक्षात पाहणी करून जनतेसमोर वास्तव येणे आवश्यक झाले आहे.
वृक्ष लागवडीवरील खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 9:34 PM
वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठळक मुद्देउमरखेड तालुका : वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी देखभाल गेली कुठे ?