लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ओप्टीमायझेशन टेक्निक अॅन्ड इटस् अप्लीकेशंस इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग’ या विषयावर व्याख्यान पार पडले. चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी.पी. बेडेकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग या विद्यार्थी मंचद्वारे तृतीय, चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्युत अभियांत्रिकीमध्ये येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींवर मात करून जास्तीत जास्त योग्य व समर्पक असे उपाय योजून या क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती कशी करता येऊ शकते, याविषयी डॉ.बेडेकर यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक कौशल्य वाढविण्याचा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला. अभियांत्रिकीतील गेट (ँ३ी) या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांना सूचविले. कार्यक्रमाचे संचालन संपदा डहाके हिने केले. यावेळी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.पंकज पंडित, समन्वयक प्रा.प्रज्वल काळे, प्रा.अनुराग बोरखडे, प्रा.विद्याशेखर, प्रा.अक्षय शिरभाते, प्रा.आकाश गोफणे, प्रा.सचिन फिस्के, प्रा.जितेंद्र सावंत, प्रा.प्रणित लिखारे यांच्यासह विद्यार्थी मंचचे प्रतिनिधी आणि तृतीय व चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
‘जेडीआयईटी’मध्ये तज्ज्ञांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:40 PM