लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद, नगरपंचायतीत वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजातील स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची मजूरी आणि सुविधा व सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. या समाजावर अन्याय केला जात आहे. मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या.महाराष्ट्र राज्य सफाई स्थायी व अस्थायी कंत्राटी कर्मचारी संघटनेची बैठक पांढरकवडा येथे झाली. यावेळी किशोर तिवारी यांनी हे निर्देश दिले. प्रसंगी अमरावती सहायक संचालक डोनारकर, मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, धीरज मोहोड, नीलेश जाधव, चारूदत्त इंगुले आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सफाई स्थायी व अस्थायी कंत्राटी कर्मचारी संघटनेतर्फे जतनसिंग चव्हाण, नागेश खंडारे, डॉ. रेखा बहनवाल, शेखर ब्राह्मणे, प्रेमकुमार लेदरे, अमर चावरे, संतोष पवार आदी उपस्थित होते.यावेळी सफाई कर्मचाºयांच्या समस्या निकाली काढल्या जात नसल्याच्या व्यथा मांडण्यात आल्या. किमान वेतनानुसार पगार व्हावे, शासन निर्णयानुसार लाभ मिळावे, वेतन बँकेद्वारे करावे, नगरपरिषद आणि कंत्राटदार यांच्यात झालेल्या करारानुसार लाभ देण्यात यावे आदी मागण्या यावेळी कर्मचारी संघटनेतर्फे मांडण्यात आल्या. अनेकदा आंदोलने करूनही प्रश्न न सुटल्याने आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे प्रश्न सोडवून घेतले जातील, असे किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवरीलही समस्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर होणाºया निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बैठकीला अंकित नैताम, बाबूलाल मेश्राम, मयूर नरपांडे, रोहित व्यास, संदीप झोटिंग, अविनाश तांदुलवार, संदीप उज्जैनवार, रवी कचोटे, सचिन दुबेकार, विक्की व्यास, सतीश कचोटे, राकेश लेदरे आदी उपस्थित होते.
वाल्मिकी समाजाचे शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 9:46 PM
नगरपरिषद, नगरपंचायतीत वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजातील स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची मजूरी आणि सुविधा व सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. या समाजावर अन्याय केला जात आहे.
ठळक मुद्देसुविधांपासून दूर : शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित, पांढरकवडा येथे मांडल्या समस्या