शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वनरक्षक-वनपाल संघटनेचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 9:45 PM

जिल्हा दौºयावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देवनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा दौऱ्यावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.यवतमाळ वनवृत्ताचे पालक सचिव तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे गुरूवारी यवतमाळात आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. मंडे यांनी २२ डिसेंबर रोजी वनपाल व वनरक्षक संघटनेच्या संदर्भात एक परिपत्रक काढले. त्यात संघटनेच्या निवेदनाची, अभिवेदनाची, पत्रव्यवहाराची दखल घेऊ नये, असे निर्देश दिले. वनसंहितेत दर्शविलेल्या सूचनेप्रमाणेच वनरक्षक, वनपाल यांनी आपले कर्तव्य बजावावे, असे आदेशीत केले. या परिपत्रकामुळे वनरक्षक व वनपालांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. वनसंहितेचा आधार घेऊन सरळ अधिकृत संघटनांचे अस्तित्वच नाकारण्यात आले. याविरूद्ध महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेने उग्र भूमिका घेतली.गुरुवारी वन कार्यालयात बैठक सुरू असताना संघटनेचा मोर्चा धडकला. परिपत्रक रद्द करावे, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला. अखेर एपीसीसीएफ यांनी चर्चेची तयारी दर्शविली. त्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हिरानंद मिश्रा, कोषाध्यक्ष शेखर साठे, डी.पी. चव्हाण, अमित मोर, सुनील पवार, गहरवाल आदींचा समावेश होता.

टॅग्स :forest departmentवनविभाग