लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गुरूवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा दिला. शुक्रवारी दिवसभर वणी उपविभागातील वणीसह, मारेगाव, झरी जामणी व पांढरकवडा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात २४.१२ मि.मी.पावसाची नोंद झाली.मारेगाव शहरातील सखल भागात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वॉर्ड क्रमांक चारमधील रस्ते पाण्याखाली आले. याच वॉर्डातील संतोष बलकी, सुमन सोयाम, राजू किन्हेकर यांच्या घरात पाणी शिरले. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठिण झाले होते.मृग नक्षत्रानंतर पहिल्यांदाच वणी उपविभागात जोमदार पाऊस झाला. पावसाअभावी शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. वातावरणातील तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ आली होती. मात्र गुरूवारी सायंकाळपासून सुरू झाल्याने शेतकऱ्यांवरील संकट टळले आहे. वणी शहरातून जाणारी निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट टळले आहे.वणी तालुक्यात आजपर्यंत २५८.८१ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी ६ जुलैैपर्यंत केवळ १७१ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ८७ मि.मी.पाऊस अधिक झाला आहे. गुरूवारी सायंकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरूच होता.पांढरकवडा तालुक्यातदेखील गुरूवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या ठिकाणी गेल्या २४ तासांत ६० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे शहरातून वाहणाºया खुनी नदीच्या जलस्तरात मोठी वाढ झाली आहे. पाऊसच नसल्याने या तालुक्यात अद्याप २५ टक्के पेरण्या खोळंबून होत्या. मात्र दमदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदून गेल्या आहे. उर्वरित पेरणीलाही वेग येणार आहे.अनेक रस्ते बंदमुसळधार पावसामुळे कायर मार्गावरील परसोडा फाटा पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद होता. माजरी मार्गावरील कोंडा नाला ओव्हरफ्लो झाल्याने हा रस्ताही बंद होता. मार्डी मार्गावरील दाबोरी नालाही दुधडी भरून वाहत होता.
वणी उपविभागात सर्वदूर मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:25 PM
गुरूवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा दिला. शुक्रवारी दिवसभर वणी उपविभागातील वणीसह, मारेगाव, झरी जामणी व पांढरकवडा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
ठळक मुद्देसंततधार पावसाने जनजीवन विस्कळीत : मारेगावांत अनेक घरांत शिरले पाणी, नदी, नाल्यांना पूर