शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नजर पीक पैसेवारी ६३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 10:00 PM

जिल्ह्यात अपुºया पावसाने सर्वच पिकांची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली आहे.

ठळक मुद्देमहसूल सर्वेक्षण : शेतकरी हादरले, स्थिती नाजूक तरीही अहवाल उत्तम !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अपुºया पावसाने सर्वच पिकांची स्थिती गंभीर असताना जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली आहे. महसूल प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नजर पैसेवारी ६३ टक्के असून २०४९ महसूली गावाची पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा दिला आहे. मूग, उडीद हातचे गेले असून ज्वारीवरही चिकटा आला आहे. सोयाबीन धोक्यात असून कापूस उलंगवाडीच्या मार्गावर आहे. मात्र महसूल प्रशासनाने एका जागेवर बसून केलेल्या हवाई सर्वेक्षणाचा जबर हादरा शेतकºयांना बसला आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या यंदा ६० टक्केच पावसाची नोंद झाली. पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवली. काही भागात तर पाऊस बरसलाच नाही. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला आहे. यानंतरही जिल्ह्याची पैसेवारी ६३ टक्के आहे. २०४९ महसूली गावाची पैसेवारी उत्तम असल्याचा निर्वाळा नजर पैसेवारीत जाहीर झाला आहे.प्रारंभीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू होता तो अखेरपर्यंत कायम राहिला. यामुळे हलक्या जमिनीतील पिकांनी वेळेपूर्वीच अवसान सोडले आहे. मूग आणि उडीद पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. १० हजार हेक्टरवर मूग आणि आठ हजार हेक्टरवर शेतकºयांनी उडीदाची पेरणी केली. फुलोरा अवस्थेत या ठिकाणी पाऊस नव्हता. त्यातच किडीचे आक्रमण झाले. यामुळे मूग आणि उडीदाचे पीक जिल्ह्यातील शेतकºयांना झाले नाही. ज्वारीची अवस्था अशीच आहे. सोयाबीनची अवस्था अशीच झाली. यामुळे झाडाला शेंगा लागल्या. आता सोयाबीनचा उताराही निम्माच येत आहे. जिल्ह्यात संपूर्ण पिकांची स्थिती चिंताजनक असताना महसूल प्रशासनाला मात्र शेतात समृद्धी दिसली. जागेवर बसून केलेल्या हवाई सर्वेक्षणात पैसेवारी ६३ टक्के आली. ५० टक्क्याच्यावर पैसेवारी आल्यास स्थिती उत्तम समजून शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा नजर अहवाल पाहून शेतकरी हादरले आहे.वेळेपूर्वीच कपाशीचे कोवळे बोंड फुटलेएकीकडे अपुरा पाऊस आणि दुसरीकडे उन्हाचा वाढता पारा याचा फटका पिकांना बसत आहे. कपाशीचे बोंड वेळेपूर्वीच परिपक्व होऊन फुटत आहे. त्यामुळे एक-दोन वेच्यातच शेतात उलंगवाडी होण्याची स्थिती आहे.