जिल्हा बँकेसाठी चुरस : सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच मुहूर्त यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झंझावाताने अनेक दिग्गजांना भुईसपाट केले. राजयकीय क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या दिग्गजांनी आता सहकार क्षेत्रातील हालचालीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत विशेष चुरस निर्माण होणार आहे. सवर्च दिग्गजांचा जिल्हा बँकेवर डोळा आहे. सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी जिल्हा बँक ही माजी दिग्गजांसाठी एकमेव संधी आहे. या बँकेतून आतापर्यंत अनेकांना चांगला लाभ झाला आहे. राजकारणात पदाशिवाय कोणीही राहू शकत नाही. ज्यांनी दीड ते दोन दशक सत्ता भोगली अशी व्यक्ती पदापासून दूर राहणे कदापिही शक्य नाही. त्यामुुळे आता या पराभूतांकडून सहाकार क्षेत्रात हात आजमावले जाण्याची शक्यत आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅक ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अध्यक्ष मनिष पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सहकारातील समीकरण बदलले आहे. आता तर काँग्रेसची सर्वच स्थानिक नेतेमंडळी पुर्णवेळ रिकामी आहे. त्यामुळे बँकेच्या राजकारणात रस घेण्यासाठी त्याच्याकडे भरपूर कालावधी आहे. याची सुरूवातील गावातील सोसायटीच्या निवडणूकीतूनच होणार आहे. किमान आजपर्यंत तरी सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच दबदबा कायम राहीला आहे. हे क्षेत्र सुध्दा हातचे जाऊ नये यासाठी दोन्ही पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहे. त्यांना आपला अखेरचा जोरखम आजमावण्यासाठी प्राथमिक कर्जदार संस्था आणि सहकारी सोसायट्याच्या निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार ५२६ सोसाट्यात आहेत. त्यापैकील ७४१ सोसायट्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांची केव्हाही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. यामध्ये ब दर्जाच्या १७९ सोसायट्यात आहेत. याप्रमाणेच क दर्जाच्या ३५७, ड दर्जाच्या १०४ सोसायट्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. या सोसायट्यांची निवडणूक आटोपल्यानंतरच नव्याने बँक प्रतिनिधी निवडले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक सुध्दा सोसायटीनंतर होणार आहे. मात्र दोन्ही निवडणूक प्रक्रियेची अद्याप वेळ निश्चित नसली तरी सहकार क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारांच्या कागदपत्राची पुर्तता केली जात आहे. थकीत कर्जदार असलेल्यांना वेळेत कर्ज भरून तयार राहण्याच्या सूचनाही नेत्यांकडून दिल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पराभूत दिग्गजांचा डोळा आता सहकार क्षेत्रावर
By admin | Published: November 02, 2014 10:39 PM