तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी फुलसावंगी गाठले. भर उन्हात केवळ मर्जीतील दोन शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत बोलावून बीज प्रक्रिया कशी करावी, घरच्या सोयाबीन पिकाची उगवण शक्ती कशी तपासावी, याची माहिती दिली. विशेष म्हणजे गावात १६ कृषी केंद्र आहे. कोणाचे गोदाम कुठे आहे, याची कृषी आधिकारी आणि त्या दुकानदारालाच माहिती आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी बियाणे, खत खरेदीची लगबग करीत आहे. मात्र, कृषी कार्यालयाकडून योग्य मार्गदर्शन होताना दिसत नाही.
काही दुकानदार कच्च्या बिलावर बंदी असलेले बियाणे विकत आहे. मागील वर्षी एका स्थानिक कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी त्याला वकिली सल्ला देऊन दुसरा परवाना त्याच्या भावाच्या नावाने मिळवून दिला. जिल्हा परिषद हायस्कूललगत एका अतिक्रमित जागेत सुरू असलेल्या कृषी केंद्राला परवाना दिलाच कसा, हा संशोधनाचा विषय आहे.
बॉक्स
शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित
कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकरी मार्गदर्शनापासूनही वंचित आहे. शेतकरी बोगस बियाण्याला बळी पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. कृषी केंद्रचालक बियाणे व रायसायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री करतात. पण कृषी केंद्रांवर कारवाई करण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. काळी दौ. येथे भरारी पथकाने धाड टाकून सहा कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली, हे विशेष.