शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 2:22 PM

कर्जबाजारीपणाला कंटाळून वांजरी येथील एका शेतक-यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळल्याची घटना घडली आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे.

यवतमाळ -  कर्जबाजारीपणाला कंटाळून वांजरी येथील एका शेतक-यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळल्याची घटना घडली आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. शनिवारी पहाटे शेतात जाऊन या शेतकऱ्यानं आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. वणी तालुक्यातील वांजरी येथील शंकर बापूराव देऊळकर(४०) या शेतकऱ्याकडे ४ एकर शेत जमीन होती. त्याला जोड म्हणून तो भाडेतत्त्वावर काही जमीन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. यावर्षी मृगाच्या सरी बरसल्या आणि पेरणीला सुरुवात झाली. शंकरने सुद्धा सहकारी संस्थेचे पीक कर्ज उचलून कपाशी लागवड केली. मात्र पावसाने जणू दडी मारली. यात अनेकांची बियाणे कोंब येऊन जागीच वाळली.

शंकरने कर्ज काढून शेती केली इकडे वरून राजाने पाठ फिरवली. शंकरच्या मनात चिंतेचा काहूर माजला होता. रात्री जेवण करून तो गावातील मित्रांसोबत नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसला होता. रात्रभर मानत विचार घोळत होते. पहाट झाली, शंकर शेतात गेला आणि तेथे जाऊन बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतले व स्वतःला जाळून घेतले. यात शंकर ९० टक्के भाजला गेला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शंकरच्या शेताकडे धाव घेतली. त्याला तात्काळ वणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शंकरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरकडे हलविण्यात आले होते. त्याला चंद्रपूर कडे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. परत शंकरचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. शंकर च्या मागे पत्नी नीता आणि दोन मुले असा परिवार आहे. या शेतकरी आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या